शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई फुले कन्या योजना बारगळली

By admin | Updated: July 14, 2014 23:44 IST

सरकारने लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि स्त्री भ्रूणहत्या रोखण्याच्या दुहेरी उद्देशाने सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना सन २००६-०७ पासून सुरू केली. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी

सचिन डवके - रिद्धपूरसरकारने लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि स्त्री भ्रूणहत्या रोखण्याच्या दुहेरी उद्देशाने सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना सन २००६-०७ पासून सुरू केली. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी संवर्ग विकास अधिकाऱ्याचेच दारिद्रय रेषेखालीलच असावा, अशी अट घातल्याने योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या नगण्य आहे. यामुळे ही योजना अयशस्वी ठरली आहे. या योजनेंतर्गत एका मुलीवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणाऱ्या जोडप्यांना २०० रुपये रोख व मुलीच्या नावे आठ हजारांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र दिले जाते. तसेच दोन मुलींवर शस्त्रक्रिया केल्यास दोन हजार रुपये रोख आणि दोन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी चा-चार हजारांचे बचत प्रमाणपत्र देण्याची तरतूद आहे. मात्र, संबंधित जोडपे बीपीएल गटातील असावे, अशी शासनाची अट असल्यामुळे अनेक लाभार्थी लाभापासून वंचित आहेत. परिणामी योजनेच्या लाभार्थींचे प्रमाण हे अत्यल्प आहेत. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २० हजारांच्या आत, बीपीएलचे रेशनकार्ड जमीन, गाडी नसलेले व्यक्ती किंवा कुटुंब बीपीएलमध्ये मोडतात. परंतु आरोग्य खाते असा कोणताही पुरावा ग्राह्य धरत नाही. केवळ ग्रामीण भागात संवर्ग विकास अधिकाऱ्यांचेच बीपीएल प्रमाणपत्र लाभर्थ्यांना मागितले जाते. त्यामुळे बीपीएल यादीत असतानाही लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळत नाही. संवर्ग अधिकारी असे प्रमाणपत्र देण्यास तयार असताना आणखी पुरावे मागतात. चकरा माराव्या लागतात. विविध दाखले गोळा करावी लागतात. त्यामुळे ते काम किचकट झाल्याने या योजनेचा लाभ मिळविता येत नाही. सुरुवातीच्या दोन वर्षांत तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला मिळाला की, लाभ घेण्यास पात्र ठरत असे, परंतु आता तो दाखला बीपीएलचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येत नाही, अशी माहिती मिळाली आहे. सरकारी यंत्रणेची उदासीनता लोकप्रतिनिधींची मानसिकता या योजनेची पाठपुरावा करण्याची कुवत नसल्याने ग्रामीण भागातील कुटुंबे या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. जनजागृती झाल्याने शहरी लोक स्वत:हून कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया एक किंवा दोन मुली असतानाही करतात. परंतु ग्रामीण भागात योग्य प्रचार -प्रसार, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष त्यामुळे आजही जनजागृती झालेली नाही. तेव्हा ग्रामीण भागासाठी बीपीएलची अट या योजनेतून सरकारने रद्द करावी शिवाय प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांना लाभार्थीचे सक्तीचे टार्गेट द्यावे, अशी मागणी आहे. अन्यथा महापुरूषांच्या नावे सुरू केलेल्या योजना बारगळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.