शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या आमसभेत ‘कालबाह्य’ प्रस्तावांचा रतीब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2016 01:08 IST

महापालिकेच्या मासिक आमसभेत कार्यक्रम पत्रिकेत कालबाह्य प्रस्तावांचा रतीब घालण्यात आल्याने लोकाभिमुख प्रश्नांना ‘वाचाच’ फुटत नसल्याचे वास्तव आहे.

प्रशासनाकडून हवी उपाययोजना : सांघिक प्रयत्नांची गरज अमरावती : महापालिकेच्या मासिक आमसभेत कार्यक्रम पत्रिकेत कालबाह्य प्रस्तावांचा रतीब घालण्यात आल्याने लोकाभिमुख प्रश्नांना ‘वाचाच’ फुटत नसल्याचे वास्तव आहे. कधी एखाद्या विषयावर शाब्दिक चकमक तर दुसऱ्या विषयावर कुणाचे तरी बहिर्गमन होत असल्याने कार्यक्रम पत्रिकेची जाडी वाढू लागली आहे. या कार्यक्रम पत्रिकेतील कालबाह्य झालेले प्रस्ताव काढून टाकावेत व ही कार्यक्रमपत्रिका फ्रेश करावी, अशी मागणी बहुतांश नगरसेवकांमधून होत आहे. नगरसेवकांनी दोन वर्षापूर्वी टाकलेल्या प्रस्तावांवर आमसभेमध्ये चर्चाच न झाल्याने ते प्रस्तावच आता कालबाह्य ठरू लागले आहेत. मात्र ते अद्यापही कार्यक्रम पत्रिकेवर कायम असल्याने दिवसेंदिवस प्रस्तावांच्या संख्येतच भर पडत आहे. गतवर्षी आॅगस्टमध्ये एलबीटी प्रणाली हद्दपार झाली असताना भाजपच्या संजय अग्रवालांचा प्रश्न १९ एप्रिल २०१४ पासून कार्यक्रम पत्रिकेत आहे. १ एप्रिल २०१४ पासून स्थानिक संस्था कराच्या दराबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी २०१६ चा जुलै उजाडला, एलबीटी रद्द झाली. मात्र हा प्रश्न ‘जैसे थे’ आहे. बहुतांश नगरसेवकांना दोन वर्षापूर्वी टाकलेल्या प्रस्तावांवर उत्तरच मिळालेले नसल्याने चर्चा न झाल्याने ते प्रस्ताव कायम आहेत. विद्यमान नगरसेवकांचा सहा महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक असताना पुढील आमसभांमध्येही हे प्रस्ताव निकाली निघण्याची अजिबातच शक्यता नाही, त्यामुळे सार्वत्रिक निवडणुकीनंतरही ते रखडलेले प्रस्ताव कार्यक्रम पत्रिकेची जाडी वाढवतील की काय, अशी अनेक नगरसेवकांना भीती आहे. याशिवाय स्थानिक संस्था कराबाबतचे बहुतांश प्रस्ताव आता कालबाह्य ठरले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील जागा १४ एप्रिल २०१५ पूर्वी अधिग्रहीत करून त्याठिकाणी सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव असाच धुळखात बसला आहे. १४ एप्रिल २०१६ निघून गेल्यानंतरही पालिकेच्या आमसभेत या प्रस्तावावर चर्चा होऊ शकली नाही, हे वास्तव आहे. (प्रतिनिधी) बडनेऱ्यात टँकर पोहोचेना २० मार्च २०१५ च्या सर्वसाधारण सभेत बडनेरा शहरातील पाणीटंचाईवरील उपाययोजनेसंदर्भात काँग्रेसच्या कांचन ग्रेसपुंजे यांनी प्रस्ताव टाकला होता. आॅगस्ट २०१४ मध्ये बडनेरा शहरासाठी पिण्याच्या पाण्याचा टँकर देण्यात आला परंतु अजूनपर्यंत सुरू न केल्याबाबत चर्चा करून निर्णय घेणे, असा तो प्रस्ताव होता. दीड वर्षे उलटूनही या प्रस्तावावर चर्चा न झाल्याने हा प्रस्तावच कालबाह्य ठरला आहे. आमसभेत प्रस्तावांवरील होणारी लांबलचक चर्चा पाहता पुढील उन्हाळ्यात तरी ग्रेसपुंजेंना त्यांच्या प्रस्तावाचे उत्तर मिळेल का, याबाबत त्याही साशंक असतील. एकच प्रस्ताव दोनदा नगरसेवकांनी आमसभेमध्ये ठेवलेला प्रस्ताव वर्षोगिणती चर्चेसाठी येत नसल्याने काही नगरसेवकांना जुनाच प्रश्न रिपिट करावा लागतो. त्यामुळे उगाचाच कार्यक्रम पत्रिकेची लांबी वाढते. कार्यक्रम पत्रिकेत चार-सहा महिन्यांच्या कालावधीनंतर अनेक प्रस्ताव पुन्हा मांडण्याचा प्रयत्न नगरसेवक करतात. मात्र प्रशासनाकडून त्यांच्या प्रस्तावाला उत्तरच मिळत नाही.