शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
4
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
5
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
6
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
7
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
8
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
9
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
10
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
11
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
12
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
13
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
14
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
15
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
16
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!
18
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
19
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
20
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा

वनक्षेत्रपाल, सहायक वनसंरक्षकांच्या नियुक्तीवर विधानसभेत प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 15:30 IST

सरळ सेवा भरतीतील राज्यातील वनक्षेत्रपाल (आरएफओ) आणि सहायक वनसंरक्षकांच्या (एसीएफ) नियुक्तीच्या अनुषंगाने विधानसभेत अतारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपरिविक्षाधीन कालावधीसह मासिक दैनंदिनीवर प्रश्नचिन्हपदोन्नतीसह आर्थिक लाभाची पोलीस चौकशी

अनिल कडूलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सरळ सेवा भरतीतील राज्यातील वनक्षेत्रपाल (आरएफओ) आणि सहायक वनसंरक्षकांच्या (एसीएफ) नियुक्तीच्या अनुषंगाने विधानसभेत अतारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. यात त्यांचा परिविक्षाधीन कालावधी आणि मासिक दैनंदिनीवर आक्षेप घेण्यात आला आहे.विधानसभेतील प्रश्न क्रमांक १२७२१७ च्या अनुषंगाने मुकुल त्रिवेदी, मुख्यवनसंरक्षक, मानवसंसाधन व्यवस्थापक नागपूर यांनी आपल्या २२ जानेवारीच्या पत्राच्या अनुषंगाने राज्यातील सर्व मुख्यवनसंरक्षक (प्रादेशिक) यांच्याकडून माहिती मागविली आहे. सन २००८ ते २०१८ या कालावधीत भरती झालेल्या वनक्षेत्रपालांनी(आरएफओ) आपला दीड वर्षांचा आणि सन २०११ ते २०१६ या कालावधीत भरती झालेल्या सरळसेवा सहायक वनसंरक्षकांनी आपला १ वर्षाचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण केलेला नाही.त्यांच्या परिविक्षाधीन कालावधीतील निर्धारित क्षेत्रीय कार्यक्रम पार पाडलेला नाही. मासिक दैनंदिनीतसुद्धा त्यांची नोंद नाही. सन २००८ ते २०१७ या कालावधीत ३०० हून अधिक सरळसेवा वनक्षेत्रपालांची नियुक्ती करण्यात आल्याचे प्रश्नात नमूद आहे. या प्रश्नाच्या अनुषंगाने सविस्तर उत्तर मागवताना प्रश्नातील मासिक दैनंदिनीतील नोंदी नसल्याबाबत स्पष्ट अभिप्राय सर्व मुख्यवनसंरक्षकां (प्रादेशिक)कडून मागण्यात आला आहे.भरती नियमानुसार सरळसेवा भरतीने नियुक्त सहायक वनसंरक्षक आणि वनक्षेत्रपाल यांना निर्धारित परिविक्षाधीन कालावधी पूर्ण करणे बंधनकारक आहे. या परिविक्षाधीन कालावधीत त्यांना वनरक्षक, वनक्षेत्रपाल, न्यायालय, वनपरिक्षेत्र, मूल्यांकन, वन्यजीव आदी ठिकाणी आपला क्षेत्रीय कालावधी घालवून त्यात्या अनुषंगाने माहिती घ्यावयाची असते. परिविक्षाधीन कालावधीतील क्षेत्रिय कार्यक्रम पूर्ण न नकता, जबाबदारी पार न पाडता सरळ त्यांना वेतनवाढी दिल्या गेल्या आहेत. कालबद्ध पदोन्नत्याही देण्यात आल्या आहेत.वनक्षेत्रपाल दर्जाच्या अधिकाऱ्यांची खोटी माहिती संकलित करून, त्यांना सतत आर्थिक फायदा मिळविण्यासाठी खोटे अभिलेख तयार करणाऱ्या ११ मुख्यवनसंरक्षक (प्रादेशिक) व त्यांचे नियमबाह्य वाटप केलेल्या अतिरिक्त रकमा वसूल करण्यासंदर्भात, शासन तिजोरीत जमा करण्याबाबत अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपूर शहर यांच्याकडे एप्रिल १८ मध्ये तक्रार दाखल आहे.या तक्रारीच्या अनुषंगाने अपर पोलीस आयुक्त चौकशीकरित आहेत. चौकशीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्तांनी प्रधानमुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) नागपूर यांचे कार्यालयाला पत्रदिले आहे. या पत्राच्या अनुषंगाने मुख्यवनसंरक्षक, मानवसंसाधन व्यवस्थापन नागपूर यांनी राज्यातील सर्व मुख्यवनसंरक्षक (प्रादेशिक) यांना पत्र देऊन चौकशी करण्यास सुचविले आहे. चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :forest departmentवनविभाग