शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

राहुल गांधींविरोधात चिथावणीखोर वक्तव्य; अनिल बोंडेंविरुद्ध काँग्रेसजन संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 11:08 IST

काँग्रेसची पोलिस आयुक्तालयावर धडक : चार तास ठिय्या आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करीत काँग्रेसने बुधवारी शहर पोलिस आयुक्तालयावर धडक दिली. पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या दालनात संतप्त काँग्रेसींनी सुमारे चार तास ठिय्या दिला.

खासदार बळवंत वानखडे व आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात हे ठिय्या आंदोलन करण्यात आले. राजापेठ पोलिसांनी खा. बोंडेंविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर काँग्रेस पदाधिकारी पोलिस आयुक्तालयाची पायरी उतरले. खा. अनिल बोंडे यांच्या विधानाची दखल घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करत खासदार आमदारांसह काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, माजी महापौर विलास इंगोले, प्रवक्ते मिलिंद चिमोटे यांच्यासह जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलिस आयुक्त कार्यालय गाठले. तथा आयुक्तांना गराडा घातला. निवेदनानंतर लगेचच गुन्हा दाखल करून अटकेची मागणी करण्यात आल्याने आ. यशोमती ठाकूर व पोलिस यंत्रणेमध्ये शाब्दिक चकमकही झाली. गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही, असे बजावत काँग्रेसजण कार्यालयातच बसून राहिले. त्यामुळे तीनही पोलिस उपायुक्तांसह सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखेचे दोन्ही प्रमुख, वाहतूक व महिला सेलच्या निरीक्षक आदींनी सीपींचे कार्यालय गाठले. क्युआरटीला देखील पाचारण करण्यात आले. दुपारी ४ च्या आसपास एनसीआर दाखल झाल्यानंतर काँग्रेस जणांनी सीपी कार्यालय सोडले. 

खासदार बोंडे यांना तत्काळ अटक करा बोंडे यांनी केलेले विधान फौजदारी गुन्हेगारी स्वरूपाचे आहे. काँग्रेसच्या नेत्यांविरोधात हल्ले व्हावेत, असा प्रयल ते करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी यावेळी उपस्थित नेत्यांनी पोलिस आयुक्तांना गराडा घालत केली. जम्मू-काश्मीर आणि हरियाणा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीने वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करणे आणि दंगली भडकवण्याचा बोंडे यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी केला. यावेळी हरीष मोरे, हरिभाऊ मोहोड, भैया पवार, प्रवीण मनोहर, अमित गावंडे, वैभव देशमुख, शैलेश काळबांडे, जयश्री वानखडे, अंजली ठाकरे, शोभा शिंदे, बंडू हिवसेंसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Amravatiअमरावती