लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मॉर्निंग वॉकदरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत प्राध्यापकाचा मृत्यू झाला. राम मोहाळे (४९,रा.मनकर्णानगर, दस्तुरनगर रोड) असे मृताचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी एमआयडीसी ते छत्री तलाव रोडदरम्यान घडली.मनकर्णानगरातील रहिवासी राम मोहाडे बेनोडा परिसरातील सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. राम तुळशीराम मोहाळे रविवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास छत्री तलाव रोडवर मॉर्निंग वॉक करीत होते. दरम्यान, मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने राम मोहाडे यांना धडक देऊन पलायन केले. या अपघातात राम रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडून असल्याचे काही नागरिकांना आढळून आले. त्यांनी या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर काही वेळात राजापेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले व ओळख पटविण्यासाठी यशोदानगरापर्यंत मृतदेह घेऊन गेले. अनेकांना विचारपूस केली. मात्र, ओळख पटली नव्हती. दरम्यान, राम मोहाळे घरी परतले नसल्याचे पाहून त्यांची पत्नी व मुलगी त्यांचा शोध घेण्यास बाहेर पडले. घटनेची माहिती मिळताच त्यांनी राजापेठ ठाणे गाठून मृताच्या छायाचित्रावरून ओळख पटविली. तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा नोंदविला.हायवेवर मॉर्निंग वॉक करताना अज्ञात वाहनाच्या धडकेत प्राध्यापकाचा मृत्यू झाला. या अपघातात अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. आरोपीचा शोध सुरू केला आहे.- एस. आय. तडवी,दुय्यम ठाणेदार, राजापेठ
मॉर्निंग वॉक करताना अज्ञात वाहनाच्या धडकेत प्राध्यापक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 22:37 IST
मॉर्निंग वॉकदरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत प्राध्यापकाचा मृत्यू झाला. राम मोहाळे (४९,रा.मनकर्णानगर, दस्तुरनगर रोड) असे मृताचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी एमआयडीसी ते छत्री तलाव रोडदरम्यान घडली.
मॉर्निंग वॉक करताना अज्ञात वाहनाच्या धडकेत प्राध्यापक ठार
ठळक मुद्देछत्रीतलाव मार्गावरील घटना : राजापेठ पोलिसात गुन्हा दाखल, हायवेवर फिरणे ठरले जीवघेणे, छायाचित्रातून पटली ओळख