अमरावती : जिल्हा शिवसेनेतर्फे स्थानिक दस्तुरनगरात रामनवमीनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात मुस्लिम युवकांनी रक्तदान करून सर्वधर्मसमभावाचा परिचय करून दिला. यावेळी २५ ते ३० जणांनी रक्तदान केले.
कोरोनाच्या संकटकाळात रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, सामाजिक बांधिलकीतून रामनवमीचे औचित्य साधून शिवसेनेतर्फे या शिबिराचे आयोजन दस्तुरनगर येथील मनपा शाळेत करण्यात आले होते. कोरोना संकटावर मात करण्यासाठी जाती-धर्म असा भेद न करता उपमहानगर प्रमुख अस्लम खान पठाण, याया खान पठाण सहित तब्बल १० मुस्लिम युवकांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान करून सर्वधर्मसमभावाचा परिचय करून देत सामाजिक बांधिलकी जोपासली.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख श्याम देशमुख सहसंपर्कप्रमुख प्रदीप बाजड, प्रवीण हरमकर प्रकाश तेटू, नगरसेवक डॉक्टर राजेंद्र तायडे भारत चौधरी, प्राध्यापक प्रशांत वानखडे, ललित झंझाड, अर्चना बंडू धामणे ,सौ जयश्री कुरेकर कार्यक्रमाचे आयोजन पंकज चौधरी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.