शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
3
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
4
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
5
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
6
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
7
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
8
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
9
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
10
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
11
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
12
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
13
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
14
नाशिक बोगस शालार्थ आयडी प्रकरण : 'त्या' शिक्षक, अधिकाऱ्यांची झाडाझडती
15
जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; पूंछ जिल्ह्यात बस उलटली, दोघांचा मृत्यू तर 35 जखमी
16
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral
17
तृतीयपंथीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार; मोबाईलवर काढला व्हिडिओ, १ लाख मागितले
18
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
19
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
20
Soniya Bansal : "मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग

पपईदेखील घातकच !

By admin | Updated: May 2, 2016 00:03 IST

आंबा व केळीप्रमाणेच पपई पिकविण्यासाठीही कॅल्शियम कार्बाईडचा वापर सर्रास होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

कॅल्शियम कार्बाईडचा वापर : चिरा मारून काढतात पांढरा अर्क संदीप मानकर  अमरावतीआंबा व केळीप्रमाणेच पपई पिकविण्यासाठीही कॅल्शियम कार्बाईडचा वापर सर्रास होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे आहारात कुठली फळे घ्यावीत, असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे.जर एखाद्या रुग्णाचा डेंग्यूमुळे किंवा इतर आजाराने शरीरातील पांढऱ्या पेशी कमी होत असतील तर ते वाढविण्यासाठी डॉक्टर्स व आहारतज्ज्ञ रुग्णांना पपई आहारात घेण्याचा सल्ला देतात. तसेच पपई मध्ये पेटेन (पेपसिन) नावाचे एन्झायिम असल्यामुळे ते पचनक्रियेसाठी चांगले असते. यमध्ये व्हिटेयामिन व मिनिरलस मिळतो. परंतु मानवी जीवनाला पोषक असलेली पपई ही कॅल्शियम काबार्ईडने पिकविली जात असल्याने त्यांच्याकरिता जीवघेणी ठरत आहे. ग्रामीण भागात पपईचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊन ती येथील बाजार समितीत त्याचा लिलाव होतो. नोंदणीकृत २५ ते ३० मोठ्या व्यापाऱ्यांकडे हा माल वर्ग केला जातो. त्यानंतर पहाटे ५ वाजतादरम्यान त्याचा लिलाव होतो. शहरातील सातशे ते आठशे किरकोळ व्यापाऱ्यांकडे ही पपई विकली जाते. ग्रामीण भागात ज्याठिकाणी पपईच्या बागा असतात त्याठिकाणी झाडाला पपई पिकण्यास विलंब लागत असल्यामुळे ती तोडून त्याला रात्रभर कॅल्शियम कार्बाईड या घातक पदार्थाची उष्णता दिली जाते. दुसऱ्या दिवशी हिरवी असलेली पपई पिवळीधम्म दिसू लागते. काही व्यापारी कच्ची पपई विकत घेऊन झटपट पैसे कमविण्यासाठी कार्बाईडचा वापर केला जातो. जेव्हा पपई कच्ची राहते, तेव्हा त्याला झाडावरच चिरा मारुन पांढरा अर्क (दूध) बाहेर काढला जातो. पेटेन नावाचे एनझायम (द्रव्य)असते तो विशिष्ट प्रकारच्या तापमानात ठेवून अनेक प्रकारच्या युनीएनझायिम कॅप्सूलबनविण्यासाठी हे द्रव्य बाहेर जात असल्याचीही माहिती आहे. अंजनगाव, अचलपूर, चांदूरबाजार, भातकुली व इतर तालुक्यातून तसेच इतर जिल्ह्यांतूनही पपईला मोठी मागणी आहे. २० रुपयांपासून तर ५० रुपयांपर्यंत प्रतिकिलो दराने ती विकली जाते. अल्पावधीत पिकविली जाते पपईअमरावती : गावरानी पपईचे उत्पादन घटल्यामुळे पपईच्या शेतीला विशिष्ट प्रकारची खते व रासायनिक कीटकनाशकाच्या भरवशावर कमी दिवसांत अधिक उत्पादन मिळविण्याचा तायवान पपईला काही मागणी वाढत आहे. पपई झाडालाच असताना ती पिवळी होण्यासाठी दीर्घ कालावधी लागतो. त्यामुळे रासायनिक प्रक्रिया करून ती अल्प दिवसांत वाढीसह पिकविण्याची कलाच उत्पादकांनी अवलंबली आहे. ज्या पपई ला एक जरी पिवडा डाग पडला तर ती वर्तमानपत्रात गुंडाळून नैसर्गिकरीत्या पपई पिकविता येते परंतु याला विलंब लागतो. त्यामुळे पिकविण्यासाठी कार्बाईडचा वापर केला जातो. मात्र ती शरीराला कशी घातक आहे. याबाबत तज्ज्ञांनी उत्तम मार्गदर्शन केले आहे. एफडीएमार्फत नुकतीच बाजार समितीत धाड टाकली गेली. कॅल्शियम कार्बाईडच्या साह्याने पिकविलेला आंब्याचा साठा त्यांच्या निदर्शनास आल्याने तो वेळीच नष्ट करण्यात आला. केळी पिकविण्याच्या चेंबरमध्ये कार्बाईडचा वापर केला जात असल्याचे 'लोकमत'ने उघडकीस आणले. त्याचप्रमाणे कलिंगड लाल व आकर्षक दिसण्यासाठी इंजेक्शनद्वारे रासायनिक द्रव्य सोडण्यात येते. सफरचंदलाही चॉकलेटी मेन (व्हॅक्स) लावून जीवघेणे आजार विकले जात असल्याचे लोकमतने वृत्त मालिकेद्वारे लोकदरबारात मांडले. याची दखल पालकमंत्री प्रवीण पोटे व आ.सुनील देशमुख यांनी घेतली. एफडीए अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली व यासंदर्भाची अन्न व औषधी प्रशासन मंत्री गिरीश बापट यांच्याकडे तक्रारही केली आहे. यानंतरही आपल्या कर्तव्याप्रती अन्न प्रशासन विभागाचे अधिकारी प्रामाणिक नसून काही अधिकारी तर दीर्घ रजेवर गेल्याचे कळते. शहरात फळांसोबत रोज मृत्यू विकला जात आहे. अनेक जागरूक नागरिक 'लोकमत'च्या या मालिकेनंतर फळे विक्रेत्यांना थेट प्रश्न विचारून 'यात कॅल्शियम कार्बाईड तर नाही ना!', असा प्रश्न विचारला जात आहे. यामुळे एफडीएने जरी कारवाईचा सपाटा लावला नसला तरी कारवाई होईल या भीतीने फळविक्रेत्यांना गाशा गुंडाळला.आतड्यांचा कर्करोग होण्याची शक्यता कॅल्शियम कार्बाईडने पिकविलेली फळे नेहमी आहारात सेवन होत असेल तर आतड्यांचा कर्करोग होतो. तसेच घसाचा, अन्न नलिकेपासून तर माकड हाडापर्यंत कुठल्याही भागाचा कर्करोग होऊ शकतो, असे शल्यचिकित्सक प्रवीण बिजवे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. पपईच्या पेटेन द्रव्यातून कॅप्सूल निर्मितीपपईतून पेटेन नावाचे एन्झायिम काढण्यासाठी (पांढरे दूध) झाडावरच पपई असताना त्याला लालच्या भागाने बारीक चिरा मारून त्याचा पांढरा अर्क बाहेर काढण्यात येते त्याला विशिष्ट प्रकारच्या तापमानात ठेवून ते बाहेर पाठविण्यात येते. हा प्रकार काही व्यापारीच करतात. त्यामधून युनिएन्झायिम नावाच्या अनेक प्रकारच्या कॅप्सूल तयार होत असल्याची महिती शेती तज्ज्ञ सुधीर जगताप यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.