शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

मराठा सेवा संघाच्या कार्याचे सिंहावलोकन

By admin | Updated: August 28, 2014 23:29 IST

शिक्षणसत्ता, धर्मसत्ता व प्रचार, प्रसार माध्यम सत्ता व अर्थ सत्तांचा उपयोग बहुजन समाजासाठी झाला पाहिजे यासाठी मराठा सेवा संघांची स्थापना झाली. २४ वर्षांपासून हा संघ कार्यरत असून याचे

अमरावती : शिक्षणसत्ता, धर्मसत्ता व प्रचार, प्रसार माध्यम सत्ता व अर्थ सत्तांचा उपयोग बहुजन समाजासाठी झाला पाहिजे यासाठी मराठा सेवा संघांची स्थापना झाली. २४ वर्षांपासून हा संघ कार्यरत असून याचे सिंहावलोक करण्याचे उद्देश असल्याचे मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष श्रीवश्री कामाजी पवार यांनी आयोजित पत्र परिषदेत सांगितले.स्थानिक एका लॉनमध्ये मराठा सेवा संघाच्यावतीने पत्र परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवार हे बोलत होते. महाराष्ट्रातील मराठा समाजातील पोट जाती व बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संघटन, प्रबोधन, जागृती व प्रत्यक्ष कृती यासाठी संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी १ सप्टेंबर १९९० साली मराठा सेवा संघाची स्थापना केली. सुरुवातील समाजातील प्रतिनिधीक लोकांना सोबत घेऊन वैचारिक विचारसरणीचे रोपटे लावले. यासाठी संघाने ३२ विविध कक्ष निर्माण करून ते विविध कार्यासाठी कार्यरत आहेत. प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार, प्रदेश महासचिव मधुकर मेहेकरे व इतर कक्षांचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी दौरा आयोजित केला आहे. याची सुरुवात विदर्भातील अमरावतीतून करण्यात आली आहे. संघाच्या वाटचालीबाबत समाजातील प्रतिष्ठित विचारवंत, उद्योजक, शेतकरी व कार्यकर्ते यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांचे मत जाणून घेणे व त्यानुषंगाने मराठा सेवा संघाच्या चळवळीत योग्य बदल घडवून अधिक परिणामकारक व गतिशील वाटचाल होण्याच्या दृष्टीने या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. समाजातील समाजाचे प्रश्न समजून घेणे त्यांचा उत्साह द्विगुणित करणे या उद्देशाने या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी उद्योजक संजय जाधव यांनी उद्योगाविषयी बालसंस्कार देणे गरजेचे असल्याचे सांगितले. यासाठी प्रत्येक उद्योजकांनी पाच मुले दत्तक घेऊन त्यांना उद्योग संस्कारचे मार्गदर्शन देण्याचे आवाहन केले. मराठा समाज हा कणखर व जिद्दी आहे. मात्र घरात उद्योगी नसल्याने मुलांना उद्योगाविषयी संस्कार होत नाही. त्यामुळे त्यांच्या अंगी उद्योजक भूमिका रुजत नाही. समाजाच्या उन्नतीसाठी आता ही प्रक्रिया होणे अगत्याचे असल्याचे जाधव यांनी सांगितले. पत्र परिषदेला मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ लुंगे, सचिव उज्ज्वल गावंडे, प्रदीप देशमुख, कांचन उल्हे, नरेशचंद्र काठोळे, संदीप गावंडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)