अमरावती : राज्यातील शाळाबाह्य बालकांच्या समस्यांचा अभ्यास करुन त्याविषयी उपाययोजना सुचविण्यासाठी राज्य शासनाने एक समिती नियुक्ती केली आहे. राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक महावीर यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने शाळाबाह्य बालकांच्या समस्यांचा अभ्यास करुन त्याविषयीचा आपला अहवाल एक महिन्याच्या आत सादर करण्याचे निर्देशही राज्य शासनाने दिले आहे.शिक्षण हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसोबतच शाळाबाह्य बालकांना शाळांकडे वळविले आणि काही कारणांनी शाळा सोडून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या सुरु प्रवाहामध्ये आपल्यासाठी शिक्षण विभागाकडून मागील काही काळापासून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शाळाबाह्य बालकांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचीही या विभागाकडून मदत घेतली जात आहे. यासंदर्भात शासनाने तयारी केलेल्या शासन निर्णयानुसार शिक्षण विभागाचे अपर सचिव श्रीनिवास शास्त्री, प्रथमच्या फरीदा लांबे, शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी, दीपक नागरगोत्रे, स्पॅरोजच्या सुदेषणा परमार याची या समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे सिध्देश वाडकर यांची समितीवर सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. या समितीने एक महिन्याच्या आत सूचना आणि अभिप्राय शासनाकडे सादर करणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)
शाळाबाह्य मुलांचे होणार सर्वेक्षण
By admin | Updated: September 10, 2014 23:18 IST