शहरं
Join us  
Trending Stories
1
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
2
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
3
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
4
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
5
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
6
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
7
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
8
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
9
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
10
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
11
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
12
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
13
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
14
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
15
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
16
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला
17
मारुतीनं 'या' SUV ला खालच्या बाजूला दिले CNG सिलिंडर, मिळणार अख्खा बूट स्पेस; 2 सिलिंडर वाल्या कारचं गणित बिघडणार?
18
अदानींच्या कंपनीचा शेअर पुन्हा 'दम' दाखवणार? ब्रोकरेजच्या मते ₹645 वर जाणार! तुमच्याकडे आहे का?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचे फासे उलटे पडले; पुतिन यांची तगडी ऑफर, भारत रशियाकडून तेल खरेदी वाढवणार?
20
प्रशांत किशोरांचा निर्णय झाला! ब्राह्मणबहुल मतदारसंघातून उतरणार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

विघ्नहर्त्याच्याच मार्गात विघ्न!

By admin | Updated: August 30, 2014 01:05 IST

शुक्रवारी गणेश चतुर्थी. बाप्पाला घरी नेण्यासाठी नागरिकांची लगबग चाललेली. गणेश विक्रीचे मुख्य आणि महत्त्वाचे मार्केट म्हणून पूर्वीपासूनच नेहरू मैदानाचा बोलबाला.

इंदल चव्हाण अमरावतीअमरावती : शुक्रवारी गणेश चतुर्थी. बाप्पाला घरी नेण्यासाठी नागरिकांची लगबग चाललेली. गणेश विक्रीचे मुख्य आणि महत्त्वाचे मार्केट म्हणून पूर्वीपासूनच नेहरू मैदानाचा बोलबाला. यंदाही येथे गणेशाच्या मूर्तींची दुकाने थाटली गेली. भाविक सहकुटुंब विघ्नहर्त्याची मूर्ती खरेदी करण्यासाठी गेले. पण, मैदानात पाऊल ठेवताच चिखलाचे साम्राज्य दृष्टीस पडले. ठिकठिकाणी साचलेले डबके वाट अडवीत होते. या सगळ्यातून कसरत करून भाविकांनी कसेबसे बाप्पांना घरी आणले. या अव्यवस्थेमुळे भाविकांचा हीरमोड तर झालाच पण, मूर्ती विक्रेत्यांनाही फटका बसला.काहींनी चिखलामुळे रस्त्यावरील स्टॉलवरून मूर्ती खरेदी केली. त्यामुळे पैसे देऊन उभारलेल्या स्टॉलधारकांना किंमत कमी करावी लागली. त्याचा फटका बसल्याचे एका मूर्ती विक्रेत्याने 'लोकमत'शी बोलताना सांगितले.हे ठिकाणी म्हणजे शासकीय महसुलात भर पाडणारे महत्त्वाचे स्त्रोत समजले जाते. त्यामुळे स्टॉल असताना येथे कुठलेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वाहतूक पोलिसांसह बंदोबस्तासाठी शहर कोतवाली पोलिसांची नियुक्ती करण्यात आली. यावर्षी येथे एक पीएस आय, १० पोलीस कर्मचारी यामध्ये तीन महिला पोलीस व १० सैनिक (होमगार्ड) चा सहभाग होता. येथील मैदानात ठिकठिकाणी खड्डे पडल्याने पाण्याचे डबके तसेच मातीचा अधिक भरणा असल्याने पावसामुळे सर्वत्र चिखल साचला आहे. मात्र मूर्ती खरेदी करण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करीत चिखल तुडवावे लागले. याची व्यवस्था संबंधित विभागाने करणे महत्त्वाचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.