शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

नापिकीचे सत्र, ‘व्हिजन २०१५’ गारद!

By admin | Updated: January 27, 2015 23:23 IST

उत्पादन खर्च कमी करण्यावर भर देऊन दर हेक्टरी उत्पादनात वाढ करणे, शेतीपूरक व्यवसायाला व नगदी पीक उत्पादनाला चालना देऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करण्याचे दृष्टीने

आकड्यांचा खेळ, कागदावर समाधान गजानन मोहोड - अमरावतीउत्पादन खर्च कमी करण्यावर भर देऊन दर हेक्टरी उत्पादनात वाढ करणे, शेतीपूरक व्यवसायाला व नगदी पीक उत्पादनाला चालना देऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करण्याचे दृष्टीने कृषी विभागाने जिल्ह्यासाठी केलेल्या व्हिजन २०१५ तीन वर्षापासून ओला व कोरडा दुष्काळ, अकाली पाऊस व गारपीटने गारद झाला आहे.यंदा तर जिल्ह्यातील १९७४ गावात पैसेवारी ४६ पैसे आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत अर्धेही उत्पन्न नाही. सरासरी उत्पन्नाच्या ४० टक्के उत्पन्न होत असताना ‘हा खेळ आकड्यांचा’ ठरला आहे. अधिकाधिक आर्थिक मदत देऊन शेतकऱ्यांना सावरण्याची गरज असताना शासनाने प्रचलित निकषानुसार एकरी १८०० रूपयांची मदत देऊन शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. शेतकरी पुन्हा संकटातफेब्रुवारी २०११ मध्ये कृषी अनुसंधान केंद्र दुर्गापूर येथे अनौपचारिक गटाची बैठक होऊन कृषी विभागाचा व्हिजन अमरावती २०१५ हा कृषी विभागाचा अजेंडा ठरविण्यात आला. तत्पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याचे खासदार, आमदार, सर्व बाजार समित्यांचे सभापती, जिल्ह्यातील प्रगतीशिल शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ यांची बैठक बोलाविली होती. या बैठकीदरम्यान चर्चा, संवाद, लेखी सूचना यावरून २०१४-१५ कृषी विभागाचा आराखडा तयार करण्यात आला. सलग तीन वर्षे २०१२-१३, २०१३-१४ व खरीप २०१४, रबी २०१५ चा हंगाम जिल्ह्यात अती पाऊस, पावसात खंड, अतिवृष्टी, गारपीट यामुळे गारद झाला. केवळ शेती पिकांचे नव्हे तर फळ पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले व शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.काय आहे व्हिजन - २०१५?पीक पद्धतीत बदल, दुबार पिकाखालील क्षेत्रात वाढ, रबी क्षेत्र ३० ते ४० टक्क्यांनी वाढविणे.सुक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करून ५ वर्षात या सिंचनाखालील क्षेत्र ५० हजार हेक्टरने वाढविणे.उत्पादनक्षम फळबागाखालील क्षेत्र ७५ हजार हेक्टर करणे.संरक्षित ओलितासाठी २० हजार शेतकऱ्यांची निर्मिती.शेतकऱ्यांचे गट करून शेतीपूरक व्यवसायाला चालना देणे.यांत्रिकीकरणाला चालना देऊन मजुरीचे खर्च कपात करणे.खारपाणपट्ट्यात शेततळे, पेट्रो केरोसीन पंप, तुषार संच, रॉडो ट्यूबवेल यांच्या माध्यमातून संरक्षित ओलीत करणे. जुन्या सिमेंट बांधामधील गाळ काढून खोलीकरण व भूजलाचे पुनर्भरण करणे.मूल्याधारित जलसंधारणाच्या कामात वाढ करणे.आजची वस्तूस्थितीदुबार पिकाखालील क्षेत्रात २५ टक्क्याने वाढ झाली,पावसाअभावी खरिपाचे ७० टक्के क्षेत्र बाधित झाले, आर्द्रतेअभावी रबीची हरभऱ्याच्या सरासरी उत्पन्नात ४० ते ५० टक्क्यांनी कमी.सुक्ष्म सिंचन प्रस्ताव तालुका कार्यालयातून पुढे सरकत नाही. परिणामी अनुदानास विलंब होतो त्यामुळे शेतकरी टाळतात.उत्पादनक्षम फळबागाखालील क्षेत्र १५ ते २० हजाराने वाढल, मृगबहाराचे फळ भावाअभावी झाडावर.जानेवारीचा आंबिया बहराला पण ताण बसला नाही त्यामुळे बहार फुटला नाही. शेतकऱ्यांऐवजी राजकीय पक्ष कार्यकर्त्यांचे गट तयार झाले शेतीपूरक व्यवसाय कागदावर आकडेवारीतच राहिला. यांत्रिकीकरणामुळे मजुरीवर कुठलाही असर न होता मजुरीचे दर दिवसेंदिवस वाढतच आहे.खारपाणपट्ट्यासाठी केळकर समितीचा अहवाल कागदावरच आहे.