बचाव पथकाचे शर्थीचे प्रयत्न : प्रशासकीय अधिकारी घटनास्थळावरसंजय जेवडे - नांदगाव खंडेश्वरमासे पकडण्यासाठी अमरावती येथून आलेल्या शे. अहेमत शे. आलम (३२) हा इसम बेंबळा नदीच्या पुरात अडकल्याने त्याला तब्बल १३ तास झाडावर जागून रात्र काढावी लागली. ही घटना रविवारी दुपारी शिवणी (रसुलापूर) नजीकच्या बेंबळा व साखळी नदीच्या संगमावरील बेटावर घडली. पथकाने घेतला सुटेचा नि:श्वासही माहिती कळताच नांदगावचे ठाणेदार सुरेश चव्हाण हे पोलीस ताफ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. तसेच उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे, तहसीलदार पी.बी. पिसोळे, नायब तहसीलदार सुनील इंगळे, मंडळ अधिकारी मोहन चव्हाण, पी.बी. ढवळे, एम.एस. मार्केडे, तलाठी गजानन बिंदवाल, मनोज रोकडे, जितेंद्र सरदार, राहुल बिजवे, गजानन भेंडेकर, बबन मोहोड, नीरज दारोकार, बेंबळा नदीच्या पुलावर रात्रभर तळ ठोकून होते. ही माहिती मिळताच जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा शोध बचाव आपत्ती व्यवस्थापन पथकाचे प्रमुख संजय नागे आपल्या १२ जणांच्या चमूसह रात्रीच घटनास्थळी दाखल झाले.रविवारी दुपारी १ वाजता बेंबळा नदीत मासे पकडण्यासाठी शे. अहमद येथे आला होता. अचानक सायंकाळी ५ वाजता नदीला पूर आल्याने संगमावरील बेटावर तो धावत गेला. पुराच्या पाण्याने बेट वेढले जात असल्याचे पाहून तो तेथील एका पळसाच्या झाडावर चढला. पण पुराचे पाणी पसरल्याने तो पुरात अडकला. शेतात काम करणाऱ्या इसमांनी ही माहिती शिवणी रसुलापूर गावातील लोकांना दिली. गावकरीही मदत कार्यासाठी धाऊन आलेत. बचाव पथकाने रात्री १२ वाजता त्याला काढण्याचा प्रयत्न केला. पण पुराचा जोर व अंधार यामुळे त्याच्यापर्यंत पोहचणे कठीण होते.
१३ तास झाडावर काढली रात्र
By admin | Updated: September 1, 2014 23:14 IST