निविदा काढल्या : ‘माइंड लॉजिक’चा आॅनलाईन निकाल प्रक्रियेला नकारअमरावती: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने परीक्षेच्या ‘एन्ड टू एन्ड’ कामांसाठी नव्या एजन्सीला शोध चालविला आहे. त्याकरिता निविदा प्रक्रिया युद्धस्तरावर राबविण्यात आली आहे. उन्हाळी परीक्षांचे आॅनलाईन निकाल घोषित करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने कंबर कसली आहे.विद्यापीठाने अभियांत्रिकी, विधी व फार्मसी अभ्यासक्रमांच्या परीक्षांमध्ये आॅनलाईन प्रणालीचा अवलंब केला आहे. त्याकरिता बंगळूरु येथील ‘माइंड लाजीक’ या एजन्सीची मदत घेतली होती. परंतु अभियांत्रिकी व तांत्रिकी परीक्षांचे ‘एन्ड टू एन्ड’ नियमन करणाऱ्या एजन्सीने निकाल प्रक्रियेत सहभागी होणार नसल्याचे पत्र परीक्षा मंडळाचे संचालकांना दिले आहे. त्यामुळे उन्हाळी परीक्षांचे निकाल आॅनलाईन घोषित झाले पाहिजे, यावर कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांचा भर आहे. दरम्यान प्रायोगिक तत्वावर अभियांत्रिकी, तांत्रिक व फार्मसी अभ्यासक्रमांच्या परीक्षा प्रक्रिया आॅनलाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांकडून अर्ज, शुल्क मागविणेसोबत प्रश्नपत्रिका, परीक्षा केंद्रावर आॅनलाईन पाठविणे, उत्तर पत्रिकांची आॅनलाईन तपासणी तसेच आॅनलाईन निकाल घोषित करण्याचा कंत्राट ‘माइंड लॉजीक’ एजन्सीकडे सोपिवण्यात आला होता. मात्र या तिन्ही अभ्यासक्रमांचे आॅनलाईन निकाल वेळेपूर्वी लावण्यात एजन्सीला शक्य झाले नाही. त्यामुळे येत्या उन्हाळी परीक्षांचे परीक्षा नियमन न करण्याबाबतचे पत्र ‘माइंड लॉजीक’ने विद्यापीठाला दिले आहे. दरम्यान सर्वच अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल आॅनलाईन करण्यासंदर्भात निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. नव्याने ज्या एजन्सीकडे परीक्षांचे ‘एन्ड टू एन्ड’ कामे सोपविली जाणार त्याच एजन्सीसोबत येत्या उन्हाळी परीक्षांचे आॅनलाईन निकाल घोषित करण्याबाबतचा करार करण्यासाठी विद्यापीठाने तयारी चालविली आहे. येत्या काही दिवसांत परीक्षांबाबत ‘एन्ड टू एन्ड’ कामे सोपविण्यासाठी नव्या एजन्सीकडे जबाबदारी सोपविली जाणार आहे. कुलगुरु चांदेकर यांनी आॅनलाईन निकालाबाबत गोंधळ निर्माण होणार नाही, त्यासाठी सक्षम एजन्सीचा शोध घेत असल्याची माहिती आहे. विद्यापीठ परीक्षांचे ‘एन्ड टू एन्ड’ कामे ही कोणत्या एजन्सीकडे सोपविते, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.जुन्या एजन्सीने परीक्षांचे नियमन शक्य नसल्याबाबतचे पत्र दिले आहे. अभियांत्रिकी, विधी व फार्मसी या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अन्य परीक्षांचे ‘एन्ड टू एन्ड’ कामे सोपविण्यासाठी नव्याने कंत्राट सोपविला जाणार आहे. त्याकरिता निविदा प्रक्रिया राबविली आहे. अंतिम निर्णय कुलगुरु घेतील.- जयंत वडतेसंचालक, परीक्षा मंडळ विद्यापीठ
परीक्षेच्या ‘एन्ड टू एन्ड’साठी नव्या एजन्सीचा शोध
By admin | Updated: March 30, 2017 00:13 IST