शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मोझरी, भारवाडी फीडरवर नऊ तास भारनियमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 22:18 IST

सूरज दाहाट । लोकमत न्यूज नेटवर्क तिवसा : तालुक्यात तब्बल ९ तास भारनियमन सुरू आहे. परिणामी विजेवरील उपकरण बंद ...

ठळक मुद्देग्रामीण भागात पाणीटंचाई : विविध अडचणींमुळे नागरिकांमध्ये रोष

सूरज दाहाट ।लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : तालुक्यात तब्बल ९ तास भारनियमन सुरू आहे. परिणामी विजेवरील उपकरण बंद राहत असल्यामुळे नागरिकांना विविध समस्या भेडसावत आहेत. यावर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.राज्यात वीज निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात कोळशाचा वापर होत असून, त्याचा पुरवठा कमी झाल्याने वीज निर्मितीवर परिणाम जाणवत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात भारनियमनाच्या वेळेत अधिकच वाढ झाल्याने नागरिकांची कामे प्रभावित होत आहे. त्याचा सर्वाधिक फटका तालुक्यातील मोझरी, भारवाडी, गुरुदेवनगरातील फिडरला बसत आहे. नवरात्रोत्सवात भारनियमन सुरू असल्याने संताप व्यक्त होत आहे. विजेअभावी ग्रामीण पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. मागणीच्या तुलनेत वीज निर्मिती अल्प होत झाल्याने महावितरण कंपनीने ग्रामीण भागात तीन टप्प्यात ९ तास १५ मिनिटे भारनियमन सुरू केले. मात्र ज्या फीडरवर वीज ग्राहकांची वसुली ९० टक्के हून अधिक आहे असे फीडरर वरील गावे ग्राहकांना भारनीयमातुन सूट दिल्या जात असली तरी बहुतांश फिटरची वसुली ५५ते६०टक्के पेक्षा अधिक नसल्याने भारनियमनाची झळ सर्वांना पोहचली आहे. गुरुदेव नगर मोझरी फिटरची वसली ६२ टक्केपर्यंत पोहचली. मात्र, ३८ टक्के ग्राहकांनी वीज भरणा न केल्याने भारनीयमन सुरू झाले आहे.भारनियमनामुळे पाणीटंचाईचे सावटतालुक्यातील भारवाडी फीडरवर भारनियमन सुरू असल्याने या फीडरवरील वर्धा नदीच्या तिरावरून मोझरी, गुरुदेवनगर,तिवसा शहराला पाणीपुरवठा होतो. मात्र, येथे भारनियमन सुरू असल्याने या ठिकाणी आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.सणासुदीत ९ तासांच्या भारनियमनामुळे सिंचन व पाणीपुरवठ्याअभावी नागरिकांचे हाल होत असल्याने युवक काँग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.-वैभव स वानखडे,नगराध्यक्ष, न. पं. तिवसाराष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव २३ आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. भारनियमनाचा या महोत्सवाला फटका बसू शकतो. त्यामुळे लोडशेडिंग बंद करावे.बबलू मक्रमपूरे, सरपंच गुरुकुंज मोझरी