शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटचे जंगल होणार ‘टायगर’मय

By admin | Updated: January 16, 2017 00:17 IST

मेळघाटात वाघांच्या वाढत्या संख्येने त्यांचे संंरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने मेळघाट व्याघ्र प्रकल्पांच्या ...

‘एनटीसीए’कडे प्रस्ताव : वनविभागाचे ७०० किलोमीटर क्षेत्र व्याघ्र प्रकल्पाच्या ताब्यातअमरावती : मेळघाटात वाघांच्या वाढत्या संख्येने त्यांचे संंरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने मेळघाट व्याघ्र प्रकल्पांच्या बाहेरील असलेले बफरक्षेत्र (कोअर) जंगल ताब्यात घेण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण दलाकडे पाठविण्यात आला आहे. प्रादेशिक वनविभागाच्या सुमारे ७०० कि.मी. जंगलाचा यात समावेश राहणार आहे. त्यामुळे आता मेळघाटचे जंगल हे ‘टायगर’मय करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर वाघांचे संवर्धन करण्यासाठी विविध उपायोजना करण्यात येत आहेत. देशात ४९ व्याघ्र प्रकल्पांत २,२२६ वाघांची नोंद करण्यात आली आहे. विशेषत: मध्यप्रदेश, महाराष्ट्रात वाघ मोठ्या संख्येने आहेत. विदर्भात ताडोबा, पेंच, मेळघाट, नागझिरा, टिपेश्वर, बोर या अभयारण्यात वाघांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र, वाघांचे संवर्धन, संरक्षणात अनंत अडचणी येत असून त्यांना मुक्त संचार करताना जंगलाचे क्षेत्र अपुरे पडत आहे. ही समस्या एकट्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पापुरतीच मर्यादित नसून इतर अभयारण्य, व्याघ्र प्रकल्पांमध्ये कायम आहे. त्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्पांच्या संचालकांनी वाघांचे संरक्षण, संवर्धनासाठी प्रादेशिक वनविभागाचे जंगल पुन्हा ताब्यात घेण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण दलाकडे पाठविण्यात आला आहे. सद्यस्थितीत मेळघाटात ४५ वाघ असून यात ८ ते १० छावे असल्याचा अंदाज व्याघ्र प्रकल्पांच्या कर्मचाऱ्यांनी वर्तविला आहे. मेळघाट हे वाघांच्या संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय चांगले ठिकाण आहे. यापूर्वी व्याघ्र प्रकल्पातील ७०० कि.मी.क्षेत्र वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. मात्र, आता व्याघ्र संवर्धनासाठी जंगलाचे क्षेत्र अपुरे ठरत आहे. परिणामी प्रादेशिक वनविभागाच्या ताब्यातील जंगलक्षेत्र पुन्हा मिळविण्यासाठी नव्याने प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावाला राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण दलाकडून मान्यता मिळताच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेत नक्कीच वाढ होऊन वाघांचे संरक्षण, संवर्धन करणे सोयीचे ठरेल, हे विशेष. (प्रतिनिधी)पूर्व, पश्चिम मेळघाटसह अकोला वनविभागाचा समावेशमेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेरील जंगलावर व्याघ्र प्रकल्पांचा ताबा रहावा, यासाठी सुमारे ७०० कि.मी.चा जंगल लक्ष्य करण्यात आला. यात प्रादेशिक वनविभागाच्या पूर्व व पश्चिम मेळघाटसह अकोला वनविभागाच्या क्षेत्राचा समावेश आहे. प्रादेशिक वनविभागाकडील जंगल वाघांना मुक्त संचार करण्यासाठी मिळावे, त्यासाठीचा हा प्रस्ताव आहे. पेंच, ताडोबा व सह्याद्री अभयारण्यातील बफरक्षेत्र यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले आहे. आता मेळघाटचे बफरक्षेत्र परत मिळण्यासाठीचा प्रस्ताव आला आहे. यात पूर्व व पश्चिम मेळघाटचा समावेश आहे. ही बाब प्रशासकीय असून मान्यता मिळताच जंगल व्याघ्र प्रकल्पाच्या ताब्यात दिले जाईल.- गिरीश वशिष्ठ, वरिष्ठ वनाधिकारी, पीसीसीएफ कार्यालय, नागपूर