शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

मेकला अपयशी

By admin | Updated: June 26, 2014 22:59 IST

पाच पोलिसांचे वास्तव्य असलेल्या वस्तीत बुधवारच्या रात्री चोरांनी घरफोड्या करून लूट केली. पोलिसांचे वास्तव्य असलेल्या मोहल्याचे हे हाल असतील तर सामान्यांचे काय, याची कल्पना न केलेलीच बरी.

पुन्हा दोन घरफोड्या : पोलिसांचीच वस्ती लुटलीअमरावती : पाच पोलिसांचे वास्तव्य असलेल्या वस्तीत बुधवारच्या रात्री चोरांनी घरफोड्या करून लूट केली. पोलिसांचे वास्तव्य असलेल्या मोहल्याचे हे हाल असतील तर सामान्यांचे काय, याची कल्पना न केलेलीच बरी. पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला यांच्या नेतृत्त्वात पोलीस दलाचा चोर, गुन्हेगारांवर वचक संपल्याचे हे आणखी एक नवे उदाहरण आहे. तीन महिन्यांपासून चोरट्यांनी अमरावतीकरांची झोप उडविली आहे. दरदिवशी शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घरफोडीच्या एकापेक्षा अधिक घटना घडत आहे. राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या सर्वाधिक घटना घडल्या. जून महिन्यातील २५ दिवसांत दहा घरफोड्या घडल्या असताना अणखी दोन घरफोड्यांची भर त्यात पडली. गोपालनगर परिसरातील कैलासनगर येथे एकाच रात्री दोन घरफोड्या करुन पन्नास हजारांचा ऐवज लंपास केला. विजय सिताराम सावरकर (६०) व सुभाष वासुदेव इंगळे (४०,रा. कैलास नगर) यांची घरे चोरांनी फोडली. विजय सावरकर हे वीज वीतरण कार्यालयातून लाईनमन पदावरुन सेवानिवृत्त झाले आहेत. बुधवारी ते कुटुंबासह घराच्या छतावर झोपले होते. चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दाराचा कोंडा तोडून आत प्रवेश केला. लोखंडी कपाटातून चांदीच्या तोरड्या, चांदीचे जोडवे, मोबाईल, रोख १७ हजार रुपये लंपास केले. त्यानंतर चोरट्यांनी मोर्चा सुभाष इंगळे यांच्या घराकडे वळविला. सुभाष यांच्या मुलाची प्रकृती ठिक नसल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. बुधवारी ते रुग्णलयात मुलाजवळ थांबले होते. मुख्य दाराचा कोंडा तोडून घरातील १० गॅ्रम सोन्याचे दागिने व रोख ४ हजार रुपये चोरले. दोन्ही घरातून एकूण ५० हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. या घटना गुरुवारी सकाळी उघडकीस येताच कैलासनगर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती राजापेठ पोलिसांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक एस. एस. भगत, उपनिरीक्षक बी. आर. बंदखडके घटनास्थळी पोहोचले. श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. घरफोडीचा गुन्हा नोंदविला. (प्रतिनिधी)