अमरावती : पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या आदेशाने शुक्रवारी रात्री उशिरा ११ पोलीस निरीक्षक, दोन एसएसआय, तर तीन पीएसआय अशा १६ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांचे आदेश जारी झाले. गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे राजापेठचे व वलगावचे ठाणेदार गाडगेनगरचे नवे ठाणेदार असेल.
राजापेठचे ठाणेदार किशोर सूर्यवंशी यांना सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक शाखा) अतिरिक्त प्रभार देण्यात आला. पोलीस नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर यांची वलगावचे प्रभारी पोलीस निरीक्षक, वलगावचे पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार यांना शहर (वाहतूक पुर्व शाखेत) प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून, तर खोलापुरीगेटचे पोलीस निरीक्षक गजानन तामटे यांना खोलापुरगेट प्रभारी पोलीस निरीक्षकपद दिले आहे. शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण काळे हे शहर वाहतूक शाखा (पश्चिम)चे प्रभारी पोलीस निरीक्षक असतील. खोलापुरीगेटचे प्रभारी पोलीस निरीक्षक यांची महिला सेलचे प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून, तर सीसीटीएनएसचे प्रभारी पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर यांची सायबर सेलचे प्रभारी पोलीस निरीक्षकपदी व सिटी कोतवालीचे प्रभारी पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे यांची आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षकपदी बदली झाली आहे. शहर वाहतूक पश्चिमचे पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांची सिटी कोतवालीचे प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून, तर सायबर सेलेचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र सहारे यांची खोलापुरीगेट येथे तर एपीआय मनीष वाकोडे यांची वलगाव, क्युआरटी पथकाचे पीएसआय कपिल मिश्रा यांची सायबर सेल, तर गुन्हे शाखेतील पीएसआय आशिष देशमुख यांची वलगाव येथे तसेचे नांदगावपेठचे पीएसआय राम कदम यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. काही अधिकारी अनेक दिवसांपासून ठाण मांडून बसले होते. मात्र या बदल्यांमुळे अनेकांमध्ये ‘कही खुशी तर कही गम’ असे चित्र दिसून आले.