शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

‘आदिवासीं’च्या एकाधिकाराला ‘खो’

By admin | Updated: October 22, 2016 00:11 IST

राज्यातील जनजाती (आदिवासी) व्यक्तींची आर्थिक स्थिती (सुधारणे) अधिनियम १९७६ मधील तरतुदीनुसार आदिवासी ..

व्यापाऱ्यांशी हातमिळवणी : अधिकाऱ्यांची संशयास्पद भूमिकाश्यामकांत पाण्डेय धारणीराज्यातील जनजाती (आदिवासी) व्यक्तींची आर्थिक स्थिती (सुधारणे) अधिनियम १९७६ मधील तरतुदीनुसार आदिवासी उपयोजना क्षेत्रात एकाधिकार खरेदी योजनेचा शुभारंभ महामंडळाचे संचालक व माजी आमदार केवलराम काळे यांच्या हस्ते शुक्रवारी कळमखार येथे करण्यात आले आहे. त्यामुळे आता एकाधिकार लागू झाल्याने खासगी व्यापाऱ्यांच्या दुकानाला कुलूप लावण्याची आवश्यकता असताना येथील विभागीय प्रबंधकांनी व्यापाऱ्यांशी हातमिळवणी करून अभय दिल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. येथील खासगी व्यापारी गरीब आदिवासी शेतकऱ्यांना रोख खरेदी करण्याच्या नावाखाली एकाधिकार योजनेच्या दरापेक्षा कमी दरात सोयाबीन, उडीद व भुईमुंगाची खरेदी करीत आहेत. अशा प्रकारची कमी दरातील खरेदी आणि तेही एकाधिकार क्षेत्रात खरेदी करणे महामंडळाच्या कायद्यानुसार फौजदारीस पात्र अपराध ठरतो. अशा लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध विभागीय व्यवस्थापकांनी त्वरित कार्यवाही करण्याची अपेक्षा असताना उलट त्यांना आदिवासींची सर्रास लूट करण्याचा परवानाच दिल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत आहे. शहरातील अमरावती-बुरहानपूर मुख्य मार्गावर जवळपास १० (दहा) दुकानांत मोठ्या थाटेने काटे लावून सोयाबीनची खरेदी करीत आहे. ही दुकाने मुख्य मार्गाच्या पूर्वेला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाक्याजवळ आणि दक्षिणेला दारुल ऊलूमच्या भाड्याच्या गाड्यावर राजरोषपणे सुरू आहे. त्याचप्रमाणे मांडवा रोड, टिंगऱ्या रोड येथे सुद्धा दुकाने थाटली गेली आहे. या सर्व दुकानांची माहिती अधिकाऱ्यांना असतानाही त्यांच्यावर कारवाई करण्याचे टाळले जात आहे. या संपूर्ण प्रकरणात मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाण-घेवाण महामंडळाचे अधिकारी आणि व्यापाऱ्यांदरम्यान झाल्याची चर्चा आहे. यापूर्वीही अधिकारी आणि व्यापाऱ्यांनी चना प्रकरणात संगनमत करून कोषाची माया जमविली होती, हे विशेष.