शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

Lok Sabha Election 2019; मतदान केंद्रांवर अवकाळीचे नियोजन काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 22:41 IST

जिल्ह्यात वादळासह गारपिटीची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तविली. पुढील दोन दिवस हीच स्थिती कायम राहणार आहे. मात्र, याच कालावधीत लोकसभेसाठी मतदान होणार असल्याने मतदारसंघातील दोन हजार केंद्रांवर पावसापासून मतदान साहित्य अन् मतदारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया गोलगोल असल्याने मतदानाचा टक्का बाधित होण्याची भीती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे‘आरओं’चे उत्तर गोलगोल : मतदान साहित्य वाचविणार; मतदार मात्र वाऱ्यावर

गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात वादळासह गारपिटीची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तविली. पुढील दोन दिवस हीच स्थिती कायम राहणार आहे. मात्र, याच कालावधीत लोकसभेसाठी मतदान होणार असल्याने मतदारसंघातील दोन हजार केंद्रांवर पावसापासून मतदान साहित्य अन् मतदारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया गोलगोल असल्याने मतदानाचा टक्का बाधित होण्याची भीती निर्माण झाली आहे.येत्या १८ एप्रिल रोजी जिल्ह्यातील दोन हजार केंद्रांवर मतदान होईल. १७ तारखेला मतदान पार्ट्या ‘एआरओ’ स्तरावरून रवाना होतील. निवडणूक विभागाचे नियोजन हे ‘एप्रिल हीट’पासून मतदारांचा बचाव करण्याचे आहे. यासाठी निवडणूक आयोगाकडून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सूचनादेखील आलेल्या आहेत. त्यानुसार नियोजन करण्यात आले असले तरी पहिल्या टप्प्यातील वर्धा मतदारसंघात समाविष्ट नांदगाव खंडेश्वर तालुक्यात अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने मतदानाची प्रक्रिया अर्धा तास विस्कळीत झाली होती. यामधून निवडणूक विभागाने काय धडा घेतला, ही बाबदेखील तेवढीच महत्त्वाची आहे. एकेका मतासाठी जसा उमेदवारांमध्ये संघर्ष होतो, त्याचप्रमाणे हेच एकेक मत लोकशाहीला बळकट करत असते, ही बाबदेखील तेवढीच महत्त्वाचीे आहे. जिल्ह्यात सध्या अवकाळी पावसाची शक्यता असल्याने त्या दृष्टीनेदेखील निवडणूक विभागाने मतदान साहित्य व मतदार यांची काळजी, सुरक्षा अन् सुविधा पुरविणे तेवढेच महत्वाचे आहे.जिल्हाभरात सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये लोकशाहीच्या महोत्सवाला भरते आले आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणाला मतदानाची टक्केवारी वाढणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी मनीषा खत्री यांना ‘स्वीप’ उपक्रमाचे नोडल आधिकारी नियुक्त करण्यात आले. त्यांनी गावपातळीवरील अधिनस्थ यंत्रणेचा सुयोग्य वापर करीत उल्लेखनीय कामगिरी केली. आता हे जागरूक मतदार मतदान केंद्रापर्यत गेल्यावर त्यांना उन्ह व पावसापासून किमान सुविधा मिळाव्यात, अशी माफक अपेक्षा आहे.पावसात साहित्य वाचविण्याच्या सूचनालोकसभा निवडणुकीतील बहुतांश मतदान केंद्रे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमध्ये आहेत आणि या शाळा व वर्गखोल्याची स्थिती ही जगजाहीरच आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान अचानक पाऊस आल्यास किंवा मतदान केंद्राच्या छपरामधूून गळती झाल्यास मतदान साहित्य तसेच सामग्री भिजण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी परिस्थिती उद्भवल्यास प्रथम साहित्य बचावाच्या सूचना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.नांदगाव खंडेश्वरला अर्धा तास खोळंबावर्धा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ११ एप्रिल रोजी मतदान सुरू असताना अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मतदानाला आलेल्या मतदारांची विशेष: महिलांची तारांबळ उडाली. अनेकांनी उन्हाच्या बचावासाठी बांधलेल्या हिरव्या नेटचा पावसापासून बचावासाठी आधार घेतला. अर्धा तास पावसामुळे मतदान प्रक्रिया रखडली होती. अशा आकस्मित संकटापासून बचाव होण्यासाठी मतदान केंद्रावर तसेच रांगेत असलेल्या मतदारांसाठी कोणत्या सुविधा आहेत, असा प्रश्न विचारल्या जात आहे.तिवसा, धारणीत पाऊस, वीजही गूलजिल्ह्यात सोमवारी पावसाची नोंद झाली. नुकसान झाले नाही. मात्र, मंगळवारी धारणी व तिवस्याला अर्धा तास पाऊस झाला. पावसासोबत वादळाने काही ठिकाणच्या फांद्यादेखील तुटल्या. यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. अशीच स्थिती जिल्ह्यात आणखी दोन दिवस राहणार आहे. या नैसर्र्गिक आपत्तीचा सामना करण्यास जिल्हा निवडणूक विभागाचा ‘मास्टर प्लॅन’ काय, अशी विचारणा केली असता, उपजिल्हा निवडणूक अधिकाºयांनी ही बाब ‘एआरओ’वर ढकलली आहे.१८ एप्रिलकरिता हवामान विभागाचा अलर्ट नाही. मात्र, अवकाळी पाऊस आल्यास मतदान साहित्य बचावासाठी वॉटरप्रुफ कापड सोबत ठेवण्याच्या सूचना दिल्यात. नागरिकांनी लोकशाहीच्या महोत्सवात सहभागी होऊन मतदान करण्याचे आवाहन केले आहे.- शैलेश नवाल, जिल्हा निवडणूक अधिकारीदोन दिवस वादळासह पावसाची शक्यता आहे. १८ तारखेला काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. दुपारनंतर काही ठिकाणी वादळासह पाऊस होऊ शकतो. जिल्ह्याचे वातावरण सतत बदलत आहे.- अनिल बंड, हवामानतज्ज्ञ

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकamravati-pcअमरावती