शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

‘धोंडी धोंडी पाणी दे’ पीक पाणी होऊ दे!

By admin | Updated: July 7, 2015 00:13 IST

गतवर्षीच्या भीषण दुष्काळाची झळ सोशित असताना शेतकऱ्यांनी या हंगामाच्या पेरणीसाठी कशीबशी आर्थिक तरतूद केली.

पावसाची दडी : भीषण दुष्काळाचे सावट, दोन्ही नक्षत्रांत पाऊस बेपत्तासंजय जेवडे नांदगाव (खंडेश्वर)गतवर्षीच्या भीषण दुष्काळाची झळ सोशित असताना शेतकऱ्यांनी या हंगामाच्या पेरणीसाठी कशीबशी आर्थिक तरतूद केली. घरात असले नसले ते बियाणे खते मातीत पेरले. आणि मागील १२ दिवसांपासून पावसाची दडी व उन्हाळ्याची प्रचिती यावी अशी कडक उन्ह तापत असल्याने पेरणी केलेल्या बियाण्यांच्या अंकुराची दयनीय गत झाली असल्याने ‘धोंडी धोंडी पाणी दे’ अशी वरुणराजाची करुणा भाकत शेतकऱ्यांचे डोळे पाणावत आहे.एक वर्षीचा दुष्काळामध्ये शेतकऱ्याला पुढील पाच वषे आर्थिक संकटाच्या खाईत लोटते. घरातील आजारपण कुटुंबातील मुला-मुलींचे शिक्षण व लग्नसमारंभ व बँकेच्या कर्जाचा सातबारा वरील बोझा हे सारे प्रश्न त्याच्या मनाला सुन्न करुन टाकतात.जून महिन्यात पावसाने जोमात हजेरी लावली. १७ ते २२ जूनपर्यंत सतत झालेला पाऊस पाहता शेतातील पेरण्या खोळंबल्या होत्या. २३ जूननंतर मात्र पावसाने कायमचीच दडी मारली. या कालावधीत सुमारे ८० टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली. काही शेतकऱ्यांची सुरुवातीच्या धडाक्याच्या पावसाने केलेली पेरणी निघाली नाही. ती दडपली होती, त्यांना पुन्हा दुबार पेरणी करावी लागली आणि आता तर पावसाच्या खंडामुळे दुपारदरम्यान तापणाऱ्या कडक उन्हात जमिनीतून निघालेल्या कोवळ्या अंकुराची केविलवाणी स्थिती झाली आहे. त्या शेतकऱ्याकडे ओलिताची सोय आहे. त्यांनी तुषार संचाद्वारे पाणी देणे सुरु केले. पण ओलिताची सोय असलेले असे अत्यल्प कास्तकार आहेत.कोरडवाहू शेती व निसर्गाच्या लहरीपणावर शेतकऱ्यांचा प्रपंच धोक्यात आला. शेतकरी दुष्काळाच्या दुष्ट चक्रार सापडला आहे. ओलीताची सोय असलेल्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला होणाऱ्या विद्युत पुरवठ्याच्या मानगुटीवर भारनियमनाचे भूत बसले असल्याने शेतकरी जेरीस आले आहेत. कोरडवाहू शेती, त्यात १२ दिवसांपासून पावसाची दडी, कडक उन्हाने जमिनीतून निघणारे केविलवाणे पिकाचे अंकुर हेसुध्दा हेसुध्दा ग्रामीण भागातील शेतीचे विदारक व मन हेलावून सोडणारे चित्र आहे. सध्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागले आहे. पावसाची प्रतीक्षा सुरूच आहे.सुरुवातीला झालेल्या दमदार पावसाने संत्रा, लिंबू या फळ पिकाने झाडावर नवती काढली. पण कडक उन्हामुळे आणि वातावरणातील बदल व त्यांच्या झालेल्या विपरीत परिणामामुळे संत्राबागेत मृग बहर फुटलाच नाही.- रमेश शिरभाते, संत्रा उत्पादक शेतकरी.तीन एकर शेतात सोयाबीन व तूर बियाणे पेरले. त्यासाठी १२ हजार ५०० रुपये खर्च आला. पण बियाणे निघालेच नाही. नंतर दुबार पेरणी केली. मात्र त्यावर आता पाऊसच नाही. त्यामुळे दुबार पेरणीची सोय करावी लागणार आहे- घनश्याम सारडा, शेतकरीनऊ बॅग सोयाबीन रासायनिक खतासह नऊ एकरांत पेरलं. त्यासाठी सुमारे ३० हजार रुपये खर्च आला. पण पेरलेले बियाणे निघालेच नाही. त्यामुळे दुबार पेरणी करावी लागणार. त्यासाठी पुन्हा जमीन तयार करणे व बियाणे व खर्च वेगळाच, अशी आमची गत दरवर्षी होत आहे.-म.इद्रिस अ. खलील, शेतकरी.