१० प्रतिष्ठानांची तपासणीअमरावती : राज्य शासनाने अभयदान योजनेतंर्गत व्यापाऱ्यांना स्थानिक संस्था करात (एलबीटी) सुट देण्याचे ठरविले आहे. त्यानुसार या योजनेचा लाभ व्यापाऱ्यांनी घ्यावा, यासाठी बुधवारी १० प्रतिष्ठानांना भेटी देवून आयुक्तांनी तपासणी केली. ३१ जुलैनंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे प्रशासनाने कळविले आहे.गत तीन वर्षांत एलबीटी कराचे अवलोकन केले असता ज्या प्रतिष्ठानांनी कच्चा माल विना देयके मागवून व्यवसाय केला, अशा प्रतिष्ठानांची शोधमोहीम सुरु झाली आहे. कर भरलेच नाही अथवा कमी कराचा भरणा केला अशा प्रतिष्ठानांवर आयुक्तांनी भेटी दिल्या. कच्चा मालावर व्यवसाय करणाऱ्या प्रतिष्ठानांना अभयदान योजेनतंर्गत कर भरुन लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त गुडेवार यांनी केले आहे. ३१ जुलैपर्यंत कराचा भरणा अदा करुन या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा ३१ जुलैनंतर १०० टक्के कर मूल्य निर्धारण करुन अंतीम आदेश पारीत केले जातील. यादरम्यान काही तृट्या आढळल्यास नियमानुसार कर वसूल केले जाईल, असा समज व्यापाऱ्यांना देण्यात आला आहे. यावेळी आयुक्त चंद्रकांत गुडेवार, उपायुक्त विनायक औगड, सहायक आयुक्त मदन तांबेकर, योगेश पिठे, अरविंद पाटील, सुनील पकडे, भूषण पुसतकर, पोलीस निरिक्षक खराटे आदी उपस्थित होते.
एलबीटी वसुली :३१ जुलैपर्यंत कर भरण्याचे आवाहन
By admin | Updated: June 25, 2015 00:14 IST