शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

युवांचा लाखाचा धूर

By admin | Updated: May 16, 2015 00:42 IST

सिगारेट आरोग्यास घातक असते, हे माहीत असतानाही उच्चशिक्षण घेणारे ४0 टक्के विद्यार्थी दररोज ८ ते १0 हजार ...

सिगारेटची नशा उच्चशिक्षित विद्यार्थ्यांची तलबअमरावती : सिगारेट आरोग्यास घातक असते, हे माहीत असतानाही उच्चशिक्षण घेणारे ४0 टक्के विद्यार्थी दररोज ८ ते १0 हजार सिगारेट ओढतात. प्रत्येक जण दररोज कमीतकमी ६ ते ८ सिगारेट सहज ओढतो. परिणामी, एक लाख रुपयांचा धूर इंजिनिअरिंगच्या कॅम्पसबाहेर निघत असतो. अभ्यासाचे टेंशन हलके करण्यासाठी नव्हे, तर फ्रेंडसर्कलमध्ये कोणी आपणास 'मिठ्ठे' म्हणून चिडवू नये यासाठी तोंडा-नाकातून धूर काढला जातो. धक्कादायक बाब म्हणजे हायस्कूलपसूनच तलब लागल्याचे अनेकांनी मान्य केले. शिक्षणासाठी परगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नशेचे प्रमाण अधिक असल्याचे सत्य समोर आले आहे. मुलगा उच्चशिक्षण घेत आहे, असे अभिमानाने आई-वडील आपल्या नातेवाईक, शेजारी, मित्रमंडळींना सांगत असतात. मात्र, दिवट्या कॉलेजमध्ये व हॉस्टेलवर काय दिवे लावतो, यापासून ते अनभिज्ञ असतात. आपण पाठविलेल्या पैशांचा तो कुठे-कुठे कश्यावर खर्च करतो, हेसुद्धा त्यांना माहीत नसते. यास काही जण अपवाद असतात हे तेवढेच सत्य. अमरावतीत अभियांत्रिकीसह विविध महाविद्यालये आहेत. येथील अनेक विद्यार्थी महाविद्यालयापेक्षा कॅम्पस बाहेरील चहा-नाश्त्याच्या टपऱ्यांवरच जास्त वेळ बसलेले दिसतात. कारण, येथे चहा-नाश्त्याआधी मनसोक्त सिगारेट ओढण्यास मिळते. इतर खर्चात बचत करुन सिगारेटचा धूर करण्यात पैसा ओतला जातो, आमच्या प्रतिनिधीने कॉलेजच्या बाहेरील परिसरात रस्त्यावर १0 ते १५ चहा टपऱ्या, नाश्ता स्टॉलवर दुपारदरम्यान पाहणी केली असता पाठीवर दप्तर व गळ्यात कॉलेजचे ओळखपत्र लटकविलेले विद्यार्थी चार ते पाच जणांचा गटाने येत होते. आल्यावर गप्पा मारता मारता सिगारेट ओढत होते. काही जण एकच सिगारेट चार ते पाच जणांना शेअर करताना दिसून आली. 'सब मिल के सिगारेट पिनेसे प्यार बढता है' असे त्यातील एका विद्यार्थ्याने सांगताच, बाकीच्यांनी एकामेकांना टाळ्या देत आपण खूप मोठा तीर मारत असल्याचे दाखवून दिले. हा प्रकार सर्रास सुरू असल्याचे दिसते. एका टपरीवर ४00 ते ५00 सिगारेट विक्री महाविद्यालय परिसरालगतच्या टपरीधारकाने सांगितले की, दिवसभरात ४00 ते ५00 सिगारेट विक्री करतो. यात ८0 टक्के सिगारेट महाविद्यालयीन विद्यार्थी खरेदी करतात. अनेकांच्या उधाऱ्या आहेत. साधारणत: ८ ते १0 रुपयांदरम्यानची सिगारेट हे विद्यार्थी विकत घेतात. कॉलेज परिसरात सिगारेट विकणे गुन्हा आहे हे आम्हाला माहिती आहे, मात्र, जे सिगारेट विकत नाही अशांच्या टपरीवर कोणी चहा-नाश्ताही करण्यासाठी जात नाहीत. नाईलाजाने आम्हाला सिगारेट विक्रीकरिता ठेवावीच लागतात. मैत्री टिकविण्यासाठीआपल्याला जास्त मित्र पाहिजे. ते केव्हाही आपल्या उपयोगात यावे, यासाठी काही जण दररोज वेगवेगळ्या मित्रांसोबत सिगारेट ओढण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जातात. त्याकरिता त्यांचा वेळही ठरलेला आहे. जो सिगारेट ओढत नाही, त्याला महत्त्व दिले जात नाही. त्यामुळेही ही सवय बळावत चालली आहे. म्हणूनच अनेकांची वर्षानुवर्षांपासूनची मैत्रीही टिकून आहे, असेही यावरून दिसून येते.न्यूनगंड घालविण्यासाठीकाही विद्यार्थी ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात आलेले असतात. त्यांच्या मनात न्यूनगंडाची भावना असते. मनातील न्यूनगंड कमी व्हावा तसेच शहरातील वातावरणात मिसळण्यासाठी ते सिगारेटच्या आहारी जातात. त्यामुळे त्यांच्यात सिगारेट ओढण्याचे प्रमाण अधिक वाढत चालले आहे. अशा विद्यार्थ्यांचे ग्रुपच बनले आहेत. चहापेक्षा सिगारटेची जादा तलबताणतणाव घालविण्याच्यादृष्टीने पूर्वी अनेक जण चहा घेण्यासाठी बाहेर पडत असत. परंतु अभियांत्रिकीचे विद्यार्थी हे चहा घेण्याचे निमित्त करुन बाहेर पडतात अन् चहाच्या टपरीवरच सिगारेट मागवून घेतात. दिलेला चहा थंडा होऊन जातो. मात्र अगोदर सिगारेटचा झुरका मारण्यातच ते मग्न झालेले असतात. सिगारेट ओढण्यासाठी त्यांना जागा पाहिजे, याकरिता ते चहा घेत असल्याचे एका हॉटेलचालकाने सांगितले. यावरुन चहापेक्षा सिगारेटचीच जादा तलब चालल्याचे स्पष्ट होत आहे. रात्रीला टपऱ्या फुल्लकाही ठिकाणी महाविद्यालय परिसरात काही नावारुपास आलेल्या टपऱ्या आहेत. त्या ठिकाणी विद्यार्थी सिगारेट घेण्यासाठी दररोज सायंकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत गर्दी करतात. दिवसभरातील अभ्यासाचा ताणतणाव घालविण्यासाठी ग्रुपच्या ग्रुप पानटपऱ्यांवर धडकतात. बाहेर फिरण्यासाठी अभियांत्रिकीच्या अभ्यासाच्या तणावामुळे तुम्ही सिगारेट ओढता का, असा प्रश्न या विद्यार्थ्यांना विचारला असता एका विद्यार्थ्याने सांगितले की, अभ्यासाचा ताण आम्ही घेतच नाही. एक शौक म्हणून सिगारेट ओढतो. आता त्याची तलबच लागली आहे, अशी सत्य परिस्थिती त्याने मांडली. दुसऱ्या विद्यार्थ्याने सांगितले की, उच्च शिक्षणाच्या प्रथम वर्षात आल्यावर सिगारेट पिऊन कोणाला ठसका लागला असे आम्ही पाहिले नाही. येथे येण्याआधीच काहींना ११ वी, १२ वी तर काहींना हायस्कूलपासूनच सिगारेटची तलब लागलेली असते. एक विद्यार्थी म्हणाला की, आमच्या वर्गातील ४० टक्के विद्यार्थी दररोज सिगारेट ओढतात. आता मुलीही सिगारेट ओढू लागल्या आहेत. पण त्यांचे प्रमाण नगण्य आहे. युवापिढी तेही उच्चशिक्षित नशेच्या आहारी गेली आहे. ‘मै फिक्र को धुए मैं उडाता चला गया’ असे गाणे गुनगुनत हे विद्यार्थी आम्ही सिगारेट पितो हे अभिमानाने एकमेकांना सांगतात, हेच दुर्दैव आहे.