वैभव बाबरेकर - अमरावतीसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये मागील ३२ वर्षांमध्ये पदवीधरांच्या संख्येमध्ये कमी अधिक प्रमाण दिसून आले. १९८५ ते २०१४ दरम्यान ५ लाख ३७ हजार ६३० विद्यार्थी पदवीधर झाले असून आतापर्यंत २ लाख पदवी प्रमाणपत्र विद्यापीठात धूळखात आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची स्थापना १९८३ साली झाली. पहिल्या वर्षी विद्यापीठांतर्गत पदवीधरांची संख्या निरंक राहिली. दुसऱ्या वर्षी १९८४ मध्ये विभागात केवळ बीएडच्या ३३२ विद्यार्थ्यांना पदवीप्रमाण वितरीत करण्यात आले होते. १९८५ साली पदवीधरांचे प्रमाण वाढत गेल्यावर ती संख्या २ हजार ५० वर पोहोचली. याचप्रमाणे दरवर्षी विद्यापीठातंर्गत येणाऱ्या महाविद्यालयांची संख्या वाढत गेल्याने प्रत्येक वर्षात पदवीधरांची संख्यासुध्दा वाढली. यामध्ये मध्यंतरी १९९६ साली २० हजार ६१७ विद्यार्थी पदवीधर झालेत. त्यानत्ांर १९९७ मध्ये पुन्हा पदवीधर कमी होऊन ती १९ हजार६४३ वर पोहोचली. त्यानंतर पुन्हा पदवीधरांचा उतरता आलेख पाहता २० हजारांवर पोहोचलेली आकडेवारी २००१ मध्ये १७ हजार ८७३ वर पोहोचली. त्यानंतर पदवीधरांचा चढता आलेख पाहायला मिळाला असून २०१४ मध्ये ३२ हजार १०५ विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त केली. या ३२ वर्षांमध्ये पदवीधरांच्या संख्येत कमी अधिक प्रमाण आढळून आले असून आतापर्यंत ५ लाख ३७ हजार ६३० विद्यार्थी पदवीधर झाले आहेत. यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांनी विद्यापीठातून पदवीप्रमाण पत्र विद्यापीठ प्रशासनाकडून तयार करण्यात आले होते. मात्र त्यापैकी २ लाखांच्या जवळपास विद्यार्थ्यांनी पदवीप्रमाणपत्र नेलेच नाही. त्यामुळे २ लाख प्रमाणपत्र अजूनही विद्यापीठात धूळखात पडलेले आहे.विद्यापीठ्यात मनुष्यबळाची कमतरतासंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी सलंग्न महाविद्यालयात दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. मात्र वाढत्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक लेखाजोखा ठेवण्याकरिता मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. तरीसुध्दा मनुष्यबळ वाढविण्याचे प्रयत्न विद्यापीठ प्रशासनाने सुरु केले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा ताण वाढतच आहे. वादविवाद, आंदोलनांमुळे विद्यापीठ चर्चेतसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ मागील काही वर्षांमध्ये चांगलेच गाजले आहे. कुलगरु कन्या गुणवाढ प्रकरण व कुलसचिवाचा स्वग्राम भत्ता प्रकरण यामुळे विद्यापीठ चांगलेच चर्चेत आले आहे. अजूनही दिनेश सूर्यवंशी यांनी आंदोलनाची भूमिका दर्शविली आहे.पदवीधारकांना विद्यापीठाकडून पत्रव्यवहार३२ वर्षांमध्ये विभागातील २ लाख पदवीप्रमाणपत्र विद्यापीठात धूळखात आहेत. या प्रमाणपत्रकरिता विद्यापीठाकडून पदवीधर विद्यार्थ्यांना पत्र देण्यात आले आहे. मात्र विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र नेलेच नाही. याकरिता दरवर्षी ५० रुपये विलंब शुल्क भरावे लागत असल्याने अनेकांनी आवश्यकता भासत नसलेल्या प्रमाणपत्राकडे दुर्लक्ष केले आहेत.
विभागात सव्वापाच लाख पदवीधर
By admin | Updated: July 16, 2014 23:50 IST