शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

राष्ट्रीयीकृत बँकांद्वारा १२ टक्केच खरीप पीककर्ज वाटप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 19:31 IST

खरीप हंगामाला सुरूवात झाली असताना विभागातील बँकांचा खरीप पीककर्ज वाटपास असहकार आहे.

अमरावती : खरीप हंगामाला सुरूवात झाली असताना विभागातील बँकांचा खरीप पीककर्ज वाटपास असहकार आहे. सद्यस्थितीत सरासरी १९ टक्के वाटप झाले असले तरी सर्वाधिक खातेदार असणा-या राष्ट्रीयीकृत बँकांचा टक्का १२.२६ टक्केच आहे. बँका शासन प्रशासनास जुमानत नसल्यामुळे ऐन पेरणीच्या काळात शेतकरी अडचणीत आले आहेत.अमरावती विभागातील बँकांना यंदा ८,५४९ कोटी ८० लाखांच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक आहे. त्या तुलनेत सद्यस्थितीत २,२५,९७२ शेतक-यांना २,२८,०९६ हेक्टर क्षेत्रासाठी १,६५६ कोटी ६० लाखांचे कर्जवाटप बँकांनी केले आहे. ही १९.३८ टक्केवारी आहे. यंदा १ एप्रिलपासून खरिपाच्या पीककर्ज वाटपाला सुरुवात झालेली आहे. यामध्ये जिल्हा बँकांनी जूनच्या सुरुवातीपासून कर्जवाटपाला सुरुवात केली आहे. विभागातील जिल्हा बँकांना यंदा २३०५.६९ कोटी रुपयांचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत १७,३९१ शेतक-यांना ३२,६५८ हेक्टरसाठी १४२.३७ कोटींचे वाटप केले. ही २६.८६ टक्केवारी आहे. अकोला जिल्हा बँकेला ६७९.२५ कोटींचे लक्ष्यांक असताना २४,०४४ शेतक-यांना ४५,४२९ हेक्टर क्षेत्रासाठी १९७.३९ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. ही २९.०९ टक्केवारी आहे. वाशीम जिल्हा बँकेने ५०४.६० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना २३,३५४ शेतक-यांना १७८.०८ कोटींचे वाटप केले. ही ३५.२९ टक्केवारी आहे. बुलडाणा जिल्हा बँकेने ४७६० शेतकºयांना ७,२३३ हेक्टरसाठी २२.८७ कोटींचे वाटप केले. ही ४८.४० टक्केवारी आहे, तर यवतमाळ जिल्हा बँकेने ७२,८७१ शेतक-यांना १,००,१४१ हेक्टरसाठी ३७६.२० कोटींचे वाटप केले. ही ६९.०८ टक्केवारी आहे.जिल्हा बँकांच्या तुलनेत राष्ट्रीयीकृत बँकांचा नन्नाचा पाढा राहिला. यामध्ये अमरावती जिल्ह्यात १३.४२ टक्के, अकोला १२.६१ टक्के, वाशीम ८.८१ टक्के, बुलडाणा ५.५८ टक्के, तर यवतमाळ जिल्ह्यात १९.७२ टक्के पीककर्ज वाटप केले आहे. ग्रामीण बँकेने सरसरी ९.२० टक्के कर्जवाटप केले आहे.  विभागातील जिल्हानिहाय कर्जवाटपअमरावती जिल्ह्यात लक्ष्यांकाच्या २९८.७५ कोटी म्हणजेच १७.७३ टक्के, अकोला जिल्ह्यात २८६.१२ कोटी म्हणजेच लक्ष्यांकाच्या २०.४६ टक्के, वाशीम जिल्ह्यात २६४.६४ कोटी म्हणजेच १७.३० टक्के, बुलडाणा जिल्ह्यात ११९.६२ कोटी म्हणजेच ६.७४ टक्के व यवतमाळ जिल्ह्यात ६८७.४५ कोटींचे वाटप सद्यस्थितीत करण्यात आले. ही ३१.८० टक्केवारी आहे. व्यापारी बँका जिल्हा प्रशासनाचे जुमानत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.