नर्सरीधारकांना लाखोंचा फटका : अपुऱ्या पावसाचा फटकाजयप्रकाश भोंडेकर शेंदूरजनाघाटविदर्भाचा कॅिलफोर्निया म्हणून वरुड तालुका देशभर परिचित आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, पश्चिम महाराष्ट्रामध्ये या संत्रा कलमांची अधिक मागणी असते. १८ महिन्यांचे उत्पादन असलेल्या संत्रा, मोसंबीसह लिंबूवर्गीय कलमांचे रोप लावल्यांनतर त्यावर सहा महिन्यांनंतर डोळे चढविले (बडींग) जाते. ही प्रक्रिया नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत चालते. नर्सरीधारकांनी डोळे चढविलेल्या कलमांची मशागत करून त्या वाढविल्या जातात. जून महिन्यात १८ महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर संत्रा कलमा विक्रीस योग्य होतात. मात्र यावर्षी पावसाने दडी मारल्याने नर्सरीधारकांवर चिंतेचे सावट पसरले आहे. जंभेरी रोपांची लागवड करणाऱ्यावरसुध्दा अवकळा पसरली आहे. मागील ६० ते ७० वर्षांपासून शेंदूरजनाघाट परिसरातील शेतकरी ईडलिंबापासून काढलेल्या बियांतून तयार केलेल्या जंभेरी नावाच्या रोपट्यावर कलमा चढवून त्यापासून संत्रा मोसंबी, लिंंबूची रोपटी (कलमा) तयार करतात. या कलमा उत्पादनाची आक्टोबर, नोव्हेंबरपासून सुरुवात केल्या जाते. ईडलिंंबू नावाच्या झाडाला येणाऱ्या फळातून बी काढून ते सावलीमध्ये सुकविले जाते. नंतर वाफा पध्दतीने त्याची पेरणी करून त्यापासून रोपटे तयार केले जातात. रोपट्याची लागवड जुलै ते आॅगस्टमध्ये सुरू केली जाते. नोव्हेंबर ते जानेवारीमध्ये डोळे बांधणी केली जाते. सदर्हू रोपटे ८ ते ९ इंच अंतरावर शेतामध्ये लावले जाते. त्यावर दोन ते ३ वर्षे वयाच्या संत्रा झाडावरील डोळा (कलम) काढून ते या रोपट्यावर चढविले जाते. जंभेरीच्या रोपट्यावर संत्राकरिता रंगपूर लाईम, मोसंबीकरिता न्युसेलर हैदराबादी, गावरानी अशा जातीच्या कलमा चढविली जाते. जून महिन्यापासून या कलमांची जोपासना केली जाते. या कलमांची वाढ होण्यास आणि विक्रीस उपलब्ध होईपर्यंत साधारणत दीड वर्षाचा (१८ महिने) कालावधी लागतो. अशा पध्दतीने संत्रासह लिंंबूवर्गीय कलमा शास्त्रोक्त पध्दतीने कलमांची निर्मिती होते. संत्रा कलमा तयार करण्याकरिता १८ ते २२ रुपयांचा खर्च येतो. यावर्षी संत्र्यासह लिंंबूवर्गीय कलमांचे सुमारे दीड ते दोन कोटींच्या घरात उत्पादन आहे. कृषी विभागाने डी.एन.ए चाचणी करुनच संत्रा, मोसंबी आणि लिंंबूवर्गीय कलमांचे उत्पादन केले जाते. कलमांच्या खरेदीकरिता. राजस्थान, मध्यप्रदेशासह देशाच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी येतात. विविध राज्याच्या कृषी विभागाच्या वतीनेसुध्दा येथून परवान्यावर खरेदी केली जाते. यातून जून ते सप्टेंबरपर्यंत काट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. तालुक्यात २७५ नर्सरी परवानाधारक तर तेवढेच विनापरवाना संत्रा कलमा निर्मिती करणारे आहेत. शेतजमिनीमध्ये (विघा) २० आरपासून तर ४०-५० आर जमिनीवर लागवड केली जाते. २० आर जमिनीवर ३५ हजार कलमां तयार केल्या जातात. यावर्षी दीड ते दोन कोटी संत्रा कलमा निर्मितीचे कार्य नर्सरीधारक करीत आहेत. विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून नावलौकिक मिळविलेल्या वरुड तालुक्यावर नैसर्गिक ते कृत्रिम असे संकट सातत्याने येत असते. यावर्षीसुध्दा नोव्हेंबर अखेरपासून जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जंभेरीच्या रोपट्यावर संत्राचा डोळा लावण्याचे काम झाले. जेमतेम लावलेल्या डोळ्याने (बडींग) अंकुरने सुरु केले होते. अनेक अडचणीवर मात करून जीवापेक्षाही अधिक जपवणूक करून संत्रा कलम तयार केल्यात. मात्र जून महिन्यापासून सतत दीड महिना पावसाने दडी मारली. यामुळे संत्रा कलमांना मागणीच नसल्याने लाखो संत्रा कलमा शेतात उभ्या आहेत. ४ ते ५ रुपये प्रति कलम भाव मिळत आहे. उत्पादन खर्च १२ ते १४ रुपये आला असल्याने अल्प दरात विकण्याची मानसिकत नसतानाही नाइलाजाने विकली जाते. नवीन लागवडीकरिता जभेंरीचे रोपटे लावले जाते. मात्र संत्रा कलमांना मागणी नसल्याने रोपालासुध्दा भाव मिळत नाही. यातूनही सावरत नर्सरीधारकांनी रोपांची लागवड केली. मात्र पाऊस नसल्याने कृत्रिम पाणी पुरवठा करुन जगविणे सुरु केले आहे. मात्र तापत्या उन्हामुळे रोपेसुध्दा सुकू लागली आहेत. त्यामुळे नर्सरीधारकांना दुहेरी संकटाला सामोरे जावे लागत आहे. अनेकांकडे यंदाच्याच कलमांची विक्री न झाल्याने कलमा तशाच पडून आहेत.नर्सरीधारकांकडे खरेदीदारांची पाठदरवर्षी पावसाळ्यात कलमांच्या खरेदीसाठी विदर्भाच्या कानाकोपऱ्यासह परप्रांतीय शेतकरी वरुड तालुक्यात येत असतात. परंतु यंदा मात्र पावसाच्या वेळापत्रकात बदल झाल्याने आणि अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने संत्राकलम लागवड करणाऱ्या नर्सरीधारकांनी कलमांच्या खरेदीसाठी फारशी गर्दी केली नाही. याची झळ नर्सरीधारकांना बसली आहे.
संत्रा कलमांपाठोपाठ जंभेरीचे रोपटेही धोक्यात
By admin | Updated: September 14, 2015 00:02 IST