लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आपत्कालीन आरोग्य सेवा पुरविण्यासाठी सज्ज असणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयात न्यूरोसर्जनचे पद अस्तित्वात नाही. त्यामुळे अपघातात मेंदूला मार लागलेल्या अनेक रुग्णांना खासगीत उपचार करून घ्यावे लागतात. त्यासाठी येणारा अफाट खर्च परवडणारा नसल्याने अनेकांचा जीव उपचाराअभावी जात असल्याची भीती व्यक्त होत आहे.अमरावती जिल्हा व जिल्ह्याबाहेरील अपघातग्रस्त रुग्णांना तात्काळ उपचार मिळण्याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णवाहिका वा अन्य वाहनाद्वारे आणले जाते. रुग्णाला त्वरेने दाखल करून घेतले जाते. अपघातग्रस्त रुग्ण रक्तबंबाळ अवस्थेत बेडवर पडून असताना, डॉक्टर तपासणी करतात. परिचारिकांना सलाइन व आवश्यक त्या औषधी देण्यास सांगितले जाते. जखमेतून रक्त थांबण्यासाठी टाके व मलमपट्टी केली जाते. रुग्ण जर बेशुद्धावस्थेत असेल किंवा त्याच्या डोक्याला मार लागला असेल, तर त्याला सीटी स्कॅन सूचविले जाते. नेमके अशावेळी काय, असा प्रश्न इर्विनमध्ये उद्भवतो. कारण नियमित वेळेत सीटी स्कॅन तंत्रज्ञ तयार असतात; मात्र रुग्ण ड्युटी टाइम नसताना कॉल केल्यानंतर हा तंत्रज्ञ उपलब्ध असेल, याची खात्री कुणीही देऊ शकत नाही.प्रत्येक क्षण जीवन-मृत्यूच्या रेषेवर घालवणाऱ्या रुग्णासाठी ही वेळ फार महत्त्वाची असते. तासभरानंतर सीटी स्कॅन झाले तरी त्याचे रिपोर्ट तपासून उपचाराची दिशा ठरविणाºया न्यूरोसर्जनचे पदच जिल्हा सामान्य रुग्णालयाला उपलब्ध करण्यात आलेले नाही.आरोग्य प्रशासनाची हेळसांडअपघातात मेंदूला मार लागलेल्या गंभीर रुग्णाला नागपूर हलविण्याचा सल्ला दिला जातो, नाही तर खासगी रुग्णालयात दाखल करावे लागते. हा कालपव्यय रुग्णांसाठी घातक ठरत आहे. इर्विन रुग्णालयात न्यूरोसर्जनचे पदच नसल्यामुळे अपघातग्रस्त रुग्णांना तपासणार कोण, असा प्रश्न उद्भवला आहे. तास-दोन तास निघून जाईपर्यंत रुग्णाची प्राणज्योत मालवते, अशी स्थिती सद्यस्थितीत येथे पाहायला मिळत आहे. २० लाख लोकसंख्येच्या आरोग्याची जबाबदारी वाहणाºया जिल्हा सामान्य रुग्णालयात अपघातग्रस्तांवर अशी वेळ येणे, ही गंभीर बाब असल्याच्या प्रतिक्रिया उपटत आहेत. तथापि, गेल्या कित्येक वर्षांपासून आरोग्य प्रशासनाने हा मुद्दा दुर्लक्षित केला आहे.न्यूरोसर्जनचे पद जिल्हा सामान्य रूग्णालयात बहाल करण्यातबाबत अनेकदा मागणी नागरिक व लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली आहे. त्यावर राज्याच्या आरोग्य विभागाकडून तातडीने विचार होण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयात न्यूरोसर्जनचे पद नाही. त्यामुळे गंभीर स्थितीतील रुग्णांना नागपूर रेफर केले जाते. यासाठी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची आवश्यकता आहे.- श्यामसुंदर निकमजिल्हा शल्यचिकित्सक
न्यूरोसर्जनअभावी इर्विनचे रुग्ण मरणाच्या दारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 22:04 IST
आपत्कालीन आरोग्य सेवा पुरविण्यासाठी सज्ज असणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयात न्यूरोसर्जनचे पद अस्तित्वात नाही. त्यामुळे अपघातात मेंदूला मार लागलेल्या अनेक रुग्णांना खासगीत उपचार करून घ्यावे लागतात. त्यासाठी येणारा अफाट खर्च परवडणारा नसल्याने अनेकांचा जीव उपचाराअभावी जात असल्याची भीती व्यक्त होत आहे.
न्यूरोसर्जनअभावी इर्विनचे रुग्ण मरणाच्या दारी
ठळक मुद्देनागपूर, खासगीत रेफर : अनेकांचे जीव गेल्याची भीती