लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : अप्पर वर्धा प्रकल्पाचे सोडलेले पाणी कालव्याने शेवटच्या शेतकऱ्याला मिळण्याऐवजी उपविभागीय अभियंत्याच्या दुर्लक्षामुळे नदी-नाल्यांनी वाहत असल्याने सिंचनाचे बारा वाजले आहेत. शेतात पेरलेल्या गहू व हरभºयाला पाणी मिळत नसल्याने २७ गावांतील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.तत्कालीन चांदूर रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार भाऊसाहेब जाधव यांच्या कार्यकाळात अप्पर वर्धा प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. या प्रकल्पाचे भूमिपूजन माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते १३ फेब्रुवारी १९६५ रोजी झाली़ १३ कोटी रुपयांच्या मूळ प्रशासकीय मान्यतेवरून १३ जुलै २००९ पर्यंत हा प्रकल्प १ हजार ३७४़६४ कोटींवर पोहोचला. ७० हजार १६९ हेक्टर क्षेत्रात सिंचनाचा लाभ मिळेल, ही अपेक्षा लालफीतशाहीने फोल ठरविली आहे. दीड हजारांवर शेतकऱ्यानी उसनवार व व्याजाने रक्कम काढून गहू व हरभºयाची पेरणी केली. परंतु, या पिकांना पाणी मिळण्याऐवजी सिंचनाचे पाणी नदी-नाल्यात जात असल्याने शेतकºयांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.उपविभागीय अभियंता बेपत्ता; कार्यालय वाऱ्यावरप्रशासकीय अधिकाºयांना ये-जा करण्याचा त्रास होऊ नये म्हणून मागील अनेक वर्षांपासून जुना धामणगाव येथे असलेले मुख्य कार्यालय अमरावती येथे हलविण्यात आले. उपविभागीय अभियंता कार्यालय येथे ठेवले; पण डी.जे. पवार यांच्याकडे अमरावती येथील अप्पर वर्धा कॉलनीतील मालमत्तेचा प्रभार आहे. पवार यांनी शेतकºयांच्या सिंचनाच्या पाण्याला महत्व देण्याऐवजी कार्यालयाच्या कामातूनच वेळ मिळत नसल्याची ओरड आहे.टेल नसल्याने वाहते पाणीधामणगाव तालुक्यातील अप्पर वर्धा प्रकल्प, जुना धामणगाव अंतर्गत विदर्भ शाखा धामणगाव घुसळी वितरिका, जळका वितरीका या वितरण प्रणालीतून १९९८-९९ पासून परिसरातील शेतकºयांना सिंचनाचे पाणी रब्बी हंगामात देणे सुरू केले़ जुना धामणगाव कार्यालयात अधिकारी नसल्याने सोडलेले पाणी नदी-नाल्यात प्रवाहित होते. या गंभीर बाबीकडे अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता दुलक्ष करीत असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.
धामणगावात सिंचनाचे वाजले बारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 05:00 IST
तत्कालीन चांदूर रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार भाऊसाहेब जाधव यांच्या कार्यकाळात अप्पर वर्धा प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. या प्रकल्पाचे भूमिपूजन माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते १३ फेब्रुवारी १९६५ रोजी झाली़ १३ कोटी रुपयांच्या मूळ प्रशासकीय मान्यतेवरून १३ जुलै २००९ पर्यंत हा प्रकल्प १ हजार ३७४़६४ कोटींवर पोहोचला.
धामणगावात सिंचनाचे वाजले बारा
ठळक मुद्देकालव्याचे पाणी नदी-नाल्यात : उपविभागीय अभियंत्याचे दुर्लक्ष, आंदोलनाचा इशारा