चांदूर बाजार : तालुक्यातील महसूल व चांदूर बाजार पोलिसांचे पथक गस्तीवर असताना चांदूर बाजार ते परतवाडा मार्गावर ट्रॅक्टरमधील रेती टाकून वाहन पळवून नेले. याप्रकरणी काजळी येथील तलाठी पंकज सुरपाटणे यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी शाहबाज खान युनूस खान (३०, रा. सैफीनगर, चांदूर बाजार) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. २६ जून रोजी ही कारवाई करण्यात आली.
--------------
सोनोरी जालनापूर येथे अवैध रेती पकडली
ब्राह्मणवाडा थडी : नजीकच्या सोनोरी जालनापूर येथे अज्ञात चालकाने ब्राह्मणवाडा पोलिसांच्या पथकाकडून पाठलाग होत असताना ट्रॅक्टर (एमएच २७ एल ९६८८) सोडून पळ काढला. त्यामधील रेतीसह ४ लाख ७९ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. २६ जून रोजी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.
-----------
पथ्रोट येथून मुलीला फूस लावून पळविले
पथ्रोट : येथून १७ वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळविल्याची घटना २५ जून रोजी निदर्शनास आली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पथ्रोट पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध २६ जूून रोजी गुन्हा दाखल केला.
----------