परतवाड्याच्या तरुणाला अटक तरुणीच्या वाहनात धमकीच्या चिठ्ठ्याअमरावती : एकतर्फी प्रेमातून तरुणीला अॅसिड फेकण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला फे्रजरपुरा पोलिसांनी मंगळवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास परतवाडा येथून अटक केली. प्रितम उत्तमगीर गिरी (१९, रा.संतोष भुवन, गाडगेनगर) असे, अटकेतील आरोपीचे नाव आहे. परतवाडा येथील रहिवासी प्रितम गिरी शिक्षणासाठी अमरावतीत आला होता. त्याने गाडगेनगर परिसरात भाड्याने घर घेऊन तंत्रनिकेतन पदविका पूर्ण केली. २०१० मध्ये गाडगेनगर परिसरात त्याला २१ वर्षीय तरुणी घरासमोरुन जाताना दिसली. त्या तरुणीची इत्थंभूत माहितीसह मोबाईल क्रमांकही त्याने मिळविला. तिला प्रेमजाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न केला. बरेच दिवस ओलांडून गेल्यावरही तरुणी दाद देत नसल्याने त्याने २०१२ मध्ये व्हॅलेन्टाईनच्या दिवशी कॉल करुन प्रेमाची भावना व्यक्त केली. मात्र, तरुणीने नकार दिल्याने प्रितमची निराशा झाली. तरीसुध्दा प्रितमने त्या तरुणीचा पाठलाग सुरु ठेवला. दरम्यान, एका ठिकाणी ती युवती तिच्या मित्रासोबत बोलताना प्रितमला दिसल्याने त्याचा राग अनावर झाला. त्यामुळे दुसऱ्या मार्गाने प्रेम मिळविण्याचा प्रयत्न प्रितमने सुरु केला. प्रितमने त्या तरुणीचे फेसबुक अकॉऊंट तयार करुन त्यावर फोटो अपलोड करणे सुरु केले. त्यासाठी पीडित तरुणीच्या ओळखीतील मित्र-मैत्रिणींशी आॅनलाईन चॅटिंग करुन माहिती प्राप्त ेकेली. त्यानंतर प्रितमने तिच्या महाविद्यालयात जाऊन तिच्या दुचाकीच्या डिक्कीत धमक्यांच्या चिठ्ठ्यादेखील टाकणे सुरु केले . माझ्यावर प्रेम जर केले नाही, तर मी तुझ्या चेहरा अॅसिड फेकून विद्रुप करेल, असे चिठ्ठीत लिहिले होते. तशाच चिठ्ठ्या प्रितमने पीडित मुलीच्या आई-वडिलांनासुध्दा पाठविल्या होत्या. त्यामुळे हा सर्व प्रकार उघड झाला. या प्रकाराबाबत तरुणीने १८ एप्रिल रोजी फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द भादंविच्या कलम ३५४(डी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचे गांभीर्य बघता पोलीस निरीक्षक डी.सी. खंडेराव, एपीआय रोशन सिरसाट पोलीस शिपाई रवींद्र राठोड, गजानन बरडे, रोशन किरसान व विजय राऊत यांनी तत्काळ तपासकार्य सुरु केले. चिठ्ठीवरील हस्ताक्षर व मोबाईल क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी मंगळवारी रात्री प्रितमला अटक केली. सिमसाठी बनावट आधार कार्डआरोपी प्रितमने आपल्या आधार कार्डावर पीडित तरुणीचे नाव व फोटो टाकून दुसरे आधार कार्ड तयार केले. त्या बनावट आधार कार्डवरून मोबाईलचे सिमकार्ड विकत घेतले होते. त्याच क्रमांकावरून पीडित तरुणीला कॉलसुध्दा केला होता. तसेच प्रितमने परतवाडा येथील गजानन निस्ताने नावाच्या मित्राकडूनसुध्दा सिमकार्ड घेतले होते. मोबाईल ट्रेस करुन पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला आहे.
माझ्यावर पे्रम केले नाही, तर चेहऱ्यावर अॅसिड फेकेन
By admin | Updated: April 30, 2015 00:24 IST