शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मी अमरावतीचा सायन्सस्कोर मैदान बोलतोयं...राज्य, राष्ट्रीय नेत्यांच्या सभांचे साक्षीदार

By गणेश वासनिक | Updated: April 7, 2024 21:51 IST

राजीव गांधी, बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदी, साेनिया गांधी आदी नेत्यांनी गाजवल्या सभा

अमरावती : अमरावती : विधानसभा, लोकसभा निवडणूक प्रचार सभा अथवा सामाजिक, शेतकरी-कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर चिंतन, मंथन किंवा राजकीय पक्षांचे मेळावे येथेच झाले आहे. अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांनी आपल्या सभा येथेच गाजवल्या आहेत. त्यांच्या अभूतपूर्व संवाद शैलीतून परिवर्तन घडल्याचा इतिहासाचीही नोंदही येथेच झाली आहे. होय मी सायन्सस्कोर मैदान बोलतोयं... लोकसभा निवडणूक २०२४ साठी आता सज्ज झालो आहे.देशाच्या स्वातंत्र्यानंतर १९५१  मध्ये पहिली लोकसभा निवडणूक झाली. १९५२ ते १९८० या दरम्यान मोठ्या प्रचार सभांचे फॅड नव्हते. थेट गावागावात भेटी-गाठी, लोकांशी संवाद यावर उमेदवारांचा अधिक भर होता.

मात्र, सायन्सस्कोर मैदानावर पहिली राजकीय सभा १९८४ मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी काँग्रेसच्या उमेदवार उषाताई चौधरी यांच्या प्रचारार्थ घेतली होती, अशी माहिती जुन्या पिढीतील जाणकारांनी दिली. तर १९९२ मध्ये सायन्सस्काेर मैदानावर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचे उमेदवार प्रकाश भारसाकडे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली होती. त्यानंतर शिवसेना-भाजपा युतीच्या नेत्यांनी सभा याच मैदानावर गाजवल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत भाजपाचे लालकृष्ण आडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, रिपाइंचे रामदास आठवले यांच्याही सभा झाल्या आहेत.

माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग, शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनीसुद्धा याच मैदानावरून मतदारांना साद घातली आहे. बसपाच्या सुप्रिमो मायावती, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, मनसेचे नेते राज ठाकरे, बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी हे मैदान गाजवले आहे. १९८९ मध्ये सुदाम देशमुख यांच्या प्रचारासाठी सायन्सस्कोर मैदानावर अभूतपूर्व अशा गर्दीची सभा झाली होती.मोठ्या मताधिक्क्याने सुदाम देशमुख यांचा विजय झाला होता. विशेषत: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सभा सायन्सस्कोर मैदानावर व्हायची आणि त्यांच्या ठाकरे शैलीतील भाषणानंतर सामान्य शिवसैनिक विचारांची शिदोरी घेऊन पेटून उठायचा, हा देखील इतिहास अमरावतीच्या जनतेने अनुभवला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही सभा

सायन्सस्कोर मैदानावर २०१४ मध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजप-सेना युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली हाेती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते सुभाष देसाई, रिपाइं नेते रामदास आठवले हे मंचावर उपस्थित हाेते. ३० मार्च २०१४ रोजी या एकाच दिवशी अकोला, नांदेड आणि अमरावती येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतल्याची नोंद आहे.इंदिरा गांधींची परतवाडा, तिवस्यात प्रचार सभा

देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७८ मध्ये काँग्रेसचे उमेदवार भय्यासाहेब ठाकूर यांच्या प्रचारासाठी तिवसा येथे सभा प्रचार सभा घेतली होती. त्यानंतर परतवाडा येथे भाऊसाहेब भोकरे यांच्यासाठी सभा घेण्यात आली. मात्र, अमरावती येेथे इंदिरा गांधी यांची सभा झाली नाही, अशी माहिती आहे.