शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
3
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
4
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
5
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
6
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
7
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
8
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
9
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
10
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
11
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
12
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
13
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
14
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
15
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
16
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
17
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
18
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
19
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
20
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री

२५८ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 23:21 IST

जिल्ह्यातील २५८ गावांमध्ये भीषण पाणीटंचाईची शक्यता गृहीत धरून भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे ३० नोव्हेंबरला अहवाल सादर करून टंचाईग्रस्त गावांची शिफारस केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी त्यांना प्रदान अधिकार अन्वये १४ डिसेंबरच्या आदेशान्वये २५८ गावांमध्ये जून २०९ या कालावधीपर्यंत टंचाईक्षेत्र घोषित केले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची घोषणा : अधिसूचना जारी, उपाययोजना प्रस्तावित

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील २५८ गावांमध्ये भीषण पाणीटंचाईची शक्यता गृहीत धरून भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे ३० नोव्हेंबरला अहवाल सादर करून टंचाईग्रस्त गावांची शिफारस केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी त्यांना प्रदान अधिकार अन्वये १४ डिसेंबरच्या आदेशान्वये २५८ गावांमध्ये जून २०९ या कालावधीपर्यंत टंचाईक्षेत्र घोषित केले.यंदा सरासरीपेक्षा २४ टक्के कमी पावसामुळे भूजलातील पाणीपातळीत १० फुटांपर्यंत सप्टेंबरअखेर घट आली. पाण्याचे स्रोत आटू लागल्याने १६५१ गावांमध्ये पाणीटंचाईची झळ असल्याचा जिल्हा परिषदेचा अहवाल आहे. त्यानुसार उपाययोजना प्रस्तावित केलेल्या आहेत. यानुसार आॅक्टोबर ते डिसेंबरअखेर ४६२ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत. त्यावर ८.५७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. जानेवारी ते मार्च २०१९ या कालावधीत ३६९ गावांकरिता ११०८ उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. त्यावर ३.९२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे, तर एप्रिल ते जून २०१९ पर्यंत ३६९ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्यात. त्यावर २.९२ रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.सद्यस्थितीत मोर्शी तालुक्यातील सावरखेड येथे एक टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर शिरखेड येथे एका विहिरीचे अधिग्रहण करून गावाला पाणीपुरवठा होत आहे.जिल्हाधिकाºयांद्वारे प्रकल्पांतील पाणीसाठ्याचे आरक्षण करण्यात आले आहे. यामध्ये वाई प्रकल्पातून पुसल्याकरिता ०.१७ दलघमी, पुसली प्रकल्पातून धनोडी, मालखेड ग्रामपंचायतीकरिता ०.१ दलघमी, वºहा-कुºहा स्वतंत्र योजनेकरिता ०.४१८ दलघमी, जावरा, फत्तेपूर, नमस्कारीकरिता ०.५० दलघमी, अंजनसिंगी-पिंपळखुट्याकरिता ०.१६८, नायगाव ०.०१५, दिघी महल्ले ०.०१५, आष्टा योजनेकरिता ०.०१, सोनोरा काकडे ०.०१५, दर्यापूर १५६ गावे योजनेकरिता शहानूर प्रकल्पातून १६.८१, चांदूर रेल्वे शहराकरिता मालखेड प्रकल्पातून १.६५, पुसली लघुप्रकल्पातून शेंदूरजनाघाट नगर परिषदेकरिता २.३३, पूर्णा प्रकल्पातून १०५ गावांच्या योजनेकरिता ३.७५, चांदी प्रकल्पातून नांदगाव खंडेश्वरकरिता १.१९, चंद्रभागा प्रकल्पातून अचलपूरकरिता ९.६१९, शेकदरी प्रकल्पातून वरूडकरिता ०.०५ व धवलगिरी प्रकल्पातून लोणीकरिता ०.१८२५ दलघमी आरक्षण जिल्हाधिकाºयांनी केले आहे.पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त अन्य वापरावर निर्बंधमहाराष्ट्र भूजल अधिनियम २००९ चे कलम २५ नुसार पाणीटंचाई क्षेत्र जाहीर करण्यात आले असले तरी कलम २६ नुसार टंचाई क्षेत्रातील विहिरींमधील पाणी काढण्यासाठी विनियमन करणे आवश्यक आहे. यामुळे टंचाई जाहीर झालेल्या २५८ गावांच्या पेयजलाच्या स्रोतापासून एक किमी अंतरातील विहिरी, विंधन विहिरी आदींचा वापर पेयजलाव्यतिरिक्त इतर उपयोगासाठी निर्बंधित करण्याची अधिसूचनादेखील जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी जारी केली आहे.असे आहेत जिल्हाधिकाºयांचे आदेशमहाराष्ट्र भूजल (पिण्याच्या पाण्याचे प्रयोजनासाठी विनियमन) अधिनियम २००९ च्या कलम २५ अन्वये जिल्हाधिकाºयांना गत पावसाळ्याचे प्रमाण, भूजल, पाण्याची पातळी व पाण्याचे पुर्नभरण लक्षात घेऊन संभाव्य पाणीटंचाई भासू शकेल अशी गावे अधिसूचित करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. या कायद्याच्या कलम २५ अन्वये प्राप्त अधिकार अन्वये १ आॅक्टोबर २०१८ ते जून २०१९ या कालावधीसाठी टंचाईक्षेत्र घोषित करण्यात येत आहे.