शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

सावधान : चिमुकल्यांमध्ये झपाट्याने पसरतोय 'एचएफएमडी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 01:22 IST

हात, पाय, तोंड व गुडघ्यांवर लालसर चट्टे किंवा फोड येणारा ‘हॅन्ड, फूट अ‍ॅन्ड माऊथ डिसीस’ (एचएफएमडी) चिमुकल्यांमध्ये झपाट्याने पसरत आहे. या आजाराची लक्षणे पाहून पालक वर्गसुद्धा हैराण झाला असून, प्रतिबंधक उपाय हाच या आजारावर उपचार असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.

ठळक मुद्देपालकवर्ग हैराण : प्रतिबंधात्मक उपाय हाच उपचार

वैभव बाबरेकर/अमरावती : हात, पाय, तोंड व गुडघ्यांवर लालसर चट्टे किंवा फोड येणारा ‘हॅन्ड, फूट अ‍ॅन्ड माऊथ डिसीस’ (एचएफएमडी) चिमुकल्यांमध्ये झपाट्याने पसरत आहे. या आजाराची लक्षणे पाहून पालक वर्गसुद्धा हैराण झाला असून, प्रतिबंधक उपाय हाच या आजारावर उपचार असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.वातावरणातील बदलामुळे सक्रिय झालेल्या 'कॉक्साकी व्हायरस ए-१६' व 'ईटेरो व्हायरस ७१' मुळे एचएफएमडी बळावत आहे. हा आजार अतिशय संसर्गजन्य असून, तो तीन ते सहा दिवस राहतो. साधारणत: १ ते ५ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये आजाराची सर्वाधिक लक्षणे येतात. सद्यस्थितीत एचएफएमडीने जिल्हाभरात पाय पसरविले असून, बहुतांश घरांतील मुलांच्या हात, पाय, गुडघा व तोंडामध्ये लालसर चट्टे किंवा फोड आल्याचे दिसून येत आहे. हा सिझनेबल आजार असून, जुलै व आॅगस्ट महिन्यात सर्वाधिक पसरत असल्याचे मत बालरोगतज्ज्ञ ऋषिकेश नागलकर यांनी वर्तविले आहे. सुरुवातीला ताप येणे आणि त्यानंतर लालसर चट्टे किंवा फोड येणे, ही या आजारांची लक्षणे आहेत. काही वेळेस हे लाल चट्टे किंवा फोड कंबरेवरसुद्धा येत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांचे आहे. लहान मुले शाळेत जातात. अशावेळी एचएफएमडी झालेल्या मुलांकडून हा संसर्ग अन्य मुलांपर्यंत जातो. काही वेळा आजाराची लक्षणे दहा वर्षांच्या वरील व्यक्तींमध्येसुद्धा दिसून येत आहे. लहान मुलांसोबत खेळणाऱ्या पालक वर्गाला एचएफएमडीचा त्रास जाणवू लागला आहे.दररोज दहा रुग्णांवर उपचारसद्यस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील नोंदीनुसार दररोज आठ ते दहा बालरुग्ण या आजाराच्या उपचारासाठी येत आहेत. याशिवाय खासगी रुग्णालयांमध्येही दररोज या आजारासाठी अनेक बालकांवर उपचार केले जात आहे. अतिशय संससर्गजन्य असणारा हा आजार जिल्हाभरात झपाट्याने पसरत आहे.अशी आहेत लक्षणेएचएफएमडी आजारात सर्वप्रथम ताप येतो. त्यानंतर हळूहळू हात, पाय, गुडघे व तोंडात लालसर चट्टे किंवा फोड येतात. तीन ते सहा दिवस ही लक्षणे असतात. उपचार न केल्यास हा आजार न्यूमोनियापर्यंत पोहोचतो. ही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे.काय घ्यावी काळजी?एचएफएमडी आजार संसर्गजन्य असल्यामुळे पालक वर्गाने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. संसर्ग झालेल्या मुलांना शाळेत पाठवू नये. इतर मुलांना दूर ठेवावे. खोकला व फोड असणाऱ्यांपासून दूर राहावे. खोकलताना मास्क किंवा रुमाल वापरावा. संसर्ग झालेल्या बाळांची विष्ठा स्वच्छ केल्यानंतर हात हॅन्डवॉशने निर्जंतुक करावे. मुलांच्या आहारात फळांचा वापर अधिक करावा.असा पसरतोय आजारव्हायरल इन्फेक्शनमुळे हवेतून पसरणारा हा आजार लहान मुलांना कवेत घेतो. शाळेतील मुलांपैकी एखाद्याला 'एचएफएमडी'चा संसर्ग झाला असल्यास त्याच्या संपर्कात येणाऱ्या अन्य मुलांनासुद्धा हा आजार होतो. खोकताना उडणाऱ्या तुषारातून हे व्हायरल एका व्यक्तीपासून दुसºया व्यक्तीपर्यंत पोहोचतात. याशिवाय संसर्ग झालेल्या मुलांची विष्ठेच्या संसर्गाने हा आजार बळावू शकतो.

टॅग्स :Healthआरोग्य