------------------------------------------
विलासनगरातून अवैध दारू जप्त
अमरावती : गाडगेनगर पोलिसांनी शनिवारी विलासनगरात धाड टाकून ३९८० रुपयांची अवैध दारू जप्त केली. खंड्या ऊर्फ प्रल्हाद सावळे ( रा. भिमनगर) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
--------------------------------------------------
नांदगावपेठ पोलिसांनी अवैध दारू पकडली
अमरावती : नांदगावपेठ पोलिसांनी पिंपळविहीर येथे रविवारी कारवाई करून ४४० रुपयांची अवैध दारू जप्त केली. आरोपी प्रवीण मारोतराव घोडमारे (४०, रा. पिंपळविहीर ) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
---------------------------------------------------
घरातून मोबाईलची चोरी
अमरावती : एका युवकाने घरात प्रवेश करून १० हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेल्याची घटना शनिवारी रोशननगरात घडली. आरोपी शाहरूख शाह (२३, रा. लालखडी) या युवकाविरुद्ध नागपुरीगेट पोलिसांनी गुन्हा नोंदविला. फिर्यादी जावेद शाह वल्द मुश्ताक शाह (२०, रा. रोशननगर) यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली.