शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
2
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
3
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
4
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवीयन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
5
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
6
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
7
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
8
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
9
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
10
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
11
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
12
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
13
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
14
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
15
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
16
तुमच्या कराचा पैसा जातोय कुठे? GST मध्ये १५ हजार कोटींचा महाघोटाळा, वाचा काय आहे हे प्रकरण!
17
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
18
Shirish Valsangkar: वळसंगकर रुग्णालयासह 'त्या' चारही डॉक्टरांची बँक खाती तपासा, मनीषा मानेचं पोलिसांना पत्र
19
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
20
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!

कॉन्व्हेंट संस्कृतीत मैदानी खेळ हरपले

By admin | Updated: July 19, 2015 00:10 IST

पूर्वी शाळा सुटल्या की गावाबाहेरील मैदानात देशी खेळ खेळणारे, सवंगड्यांसह मौजमस्ती करणारे,...

दडपण : इंग्रजी शाळांमुळे मराठी शाळांची गळचेपीचांदूरबाजार : पूर्वी शाळा सुटल्या की गावाबाहेरील मैदानात देशी खेळ खेळणारे, सवंगड्यांसह मौजमस्ती करणारे, वडाच्या पारण्याला झोके घेणारी मुले आज कॉन्व्हेन्ट संस्कृतीत हरविल्याचे निदर्शनात येत आहे. याउलट आज कॉन्व्हेंटमध्ये शिक्षकासोबत पूर्ण वेळ शाळेत घालवून परत घरी आल्यावर मुले २-३ तास गृहपाठ पूर्ण करतात. यात तो विद्यार्थी पूर्णत: थकलेला असतो. परंतु शिकवणी वर्गाच्या फॅडमुळे दोन तास त्याला ट्युशनमध्येही घालवावे लागतात. भल्या सकाळी झोपेतून उठून आलेल्या मुलाच्या पाठीवर ७ ते ८ किलो वजनाचे दप्तर देऊन ओझ्याखाली लडखडत कॉन्व्हेंटच्या दिशेने जाणारा विद्यार्थी व त्याला ‘बाय’ करणारे पालक आज सर्वत्र हमखास दृष्टीपथास पडत आहेत.वाढत्या कॉन्व्हेंटच्या फॅडमुळे मराठी माध्यमाच्या शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी डिंडोरा पिटणारे महाराष्ट्रातील नेते हा सगळा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. शासनाकडून कॉन्व्हेंटला मुक्त हस्ते परवानगी मिळत असल्याने गावखेड्यातही ‘मिनी शिक्षण सम्राट’ तयार झाले आहेत. आज इंग्रजी शिक्षणाच्या नावावर पालकांची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक सुरू आहे. पालकाकडून विविध सुविधांचा नावावर महिन्याकाठी ३०० ते ५०० रुपये शुल्क घेणे, शाळेतच गणवेश व पुस्तकांची दुकानदारी सुरू करणे, छोट्याशा खोलीत दाटीदाटीने बसविणे यासारखे प्रकार सर्वत्र सुरू आहेत. परंतु विद्यार्थ्यांना अध्ययन करणाऱ्या शिक्षकांना २, ३ हजार रूपये देऊन वेतन देऊन त्यांचे आर्थिक शोष केल्या जात आहे. आज जिल्ह्यात शिक्षण विभागाचे नियम धाब्यावर बसवून शेकडो कॉन्व्हेंट सुरू आहे. विद्यार्थ्यांचा मानसशास्त्राचा मुळीच विचार केल्या जात नाही. कधीकाळी ग्रामीण भागाचे वैभव असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आज ओस पडल्या आहेत. नव्याने तयार करण्यात आलेल्या मोठ्या खोल्याच्या इमारतीत फक्त ५ ते १० विद्यार्थ्यांना अध्ययन करीत असल्याचे चित्र आहे. पूर्वी याच शाळेमधून शिक्षण घेत विद्यार्थी, डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक झालेले आहेत.केवळ त्याचा मुलगा इंग्रजी माध्यमात शिकतो तर माझा मुलगा का नाही? या विचाराने सर्वसामान्य पालक झपाटलेला आहे. परंतु पालक, शिक्षक, शासन यांचा हट्टाच्या जात्यात निरागस बालक व त्यांचे बालपण भरडले जात आहेत. खेळण्या बागडण्याचा वयात त्याचेवर मोठे ताण देत असल्याने आपण मुलावर कोठेतरी अन्याय तर करीत नाही ना? ही जाणीव सुज्ञ नागरिकही ठेवत नसल्याचे दिसून येत नाही. काही कॉन्व्हेंटमध्ये तर इंग्रजी माध्यमात शिकणारे विद्यार्थी मराठी शब्दच विसरल्याचे वास्तव आहे. पालकांनाही आपला मुलगा सुदृढ, बलवान, आदर्श नागरिकापेक्षा इंग्रजीत पोपटपंची करणाराच आवडत आहे. (शहर प्रतिनिधी)