राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, ओबीसी, अनुसूचित जाती व अल्पसंख्याक अशा विविध प्रवर्गात मोडणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. शैक्षणिक शुल्कात सवलत तसेच वसतिगृहाच्या शुल्कासाठी भत्ता अशा स्वरूपाच्या वेगळा १४ शिष्यवृत्ती दिल्या जातात. या शिष्यवृत्तीसाठी हजारो विद्यार्थी दरवर्षी अर्ज करतात. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती मिळावी याकरीता विद्यार्थ्याना अर्ज करण्यासाठी ५ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. आता त्यामध्ये वाढ करून १५ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे.२०१९-२० मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी केलेल्या अर्जामध्ये त्रुटी आहेत. अशा विद्यार्थ्यांना ही अर्ज करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे .या विद्यार्थ्यांनी आधीच्या अर्जामध्ये सर्व त्रुटी दूर करून पुन्हा अर्ज करावा अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
शिष्यवृतीच्या अर्जासाठी मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:15 IST