गजानन मोहोड - अमरावतीखंडीत पावसामुळे जिल्ह्यातील पीक पेरणी दीड महिना रखडल्या होत्या नंतर अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आला अश्या प्रतिकुल परिस्थितीत शेतकरी अडचणीत असताना पीक विमा योजनेची मुदत ३१ जुलै रोजी संपुष्टात आली. याविषयी लोकमतने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर या योजनेला १६ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्येही केंद्र शासनाने मेख मारली आहे. केवळ आॅगस्ट महिन्यामध्ये पीक पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांचा लाभ मिळणार आहे. परिणामी जिल्ह्यात ८० टक्के पेरणी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्यामुळे मुदतवाढ ही फसवणूक असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. शेती पिकांना ६० ते ८० टक्के जोखमीस्तर व पिकानुरूप दर हेक्टरी १३ हजार ते ३ लाख ४२ हजार रूपयापर्यंत पीक विम्याचे संरक्षण कवच लाभणार या अपेक्षेत शेतकरी असताना या योजनीच मुदत ३० जुलै संपली. योजनेला केवळ ७ दिवसांचा कालावधी लाभला हे वृत्त लोकमतने दि. ३१ जुलैच्या अंकात प्रकाशित केले होते. त्याच दिवसी सायंकाळी या योजनेला १६ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत शासनाने अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सर्व पिकाकरिता विमा हप्त्यात ५० टक्के व कापूस पिकाकरीता ७५ टक्के सूट देण्यात आलेली आहे. तसेच कमाल भुधारक शेतकऱ्यांकरिता कापूस पिकासाठी ५० टक्के सूट देण्यात आली आहे.
पीक विमा योजनेला मुदतवाढ
By admin | Updated: August 2, 2014 23:52 IST