नागरिक आनंदले : चार कोटींमधून विविध कामे अंजनगाव सुर्जी : पालिकेच्या अडेलतट्टू धोरणामुळे रखडलेल्या अंजनगाव शहराच्या विकासकामांना आ. बुंदिलेंच्या प्रयत्नांनी अखेर सुरूवात झाली. या कामांसाठी एकूण ४ कोटींचा निधी मंजूर झाला असून रखडलेली कामे मार्गी लागल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. अंजनगाव शहराकरिता विशेष रस्ता अनुदान ३ कोटी व १ कोटींच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतून आता अंतर्गत रस्ते, सभागृह, सौंदर्यीकरण, घाट बांधकाम, वॉल कंपाऊंड आदी कामे मार्गी लागतील. गणेशनगर, रूपलालनगर, श्रद्धानंदनगर, रूख्मिणीनगर, बालाजी प्लॉट, महेशनगर, नायडू प्लॉट, पंचमुखीनगर, एकवीरानगर, यशनगर, अंबापेठ, विठ्ठलनगर, काठीपुरा, देवनाथ वॉर्ड, बुधवारा, गुलजारपुरा, अलकरीनगर, गोकुळढोसा, सुर्जी, शहापुरा, टांकनगर आदी ठिकाणी विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष मनोहर मुरकुटे, सुनीता मुरकुटे, विक्रम पाठक, विनायक पाटील, मुकुंद संगई, रमेश जायदे, मनीष मेन, अजय पसारी, गजेंद्र चव्हाण, जयेश पटेल, वसंत होरे, महादेव भावे, मनोहर भावे, संजय टिपरे आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
- अखेर अंजनगावात विकासकामांना प्रारंभ
By admin | Updated: October 22, 2016 00:12 IST