शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

संसार थाटण्यापूर्वीच राज्यपक्षी हरियलची शिकार

By admin | Updated: March 7, 2017 00:20 IST

उन्हाळ्यातील विणीच्या काळात संसार थाटण्याच्या तयारीत असणाऱ्या राज्य पक्षी हरियलची शिकार झाल्याने पक्षी प्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

पक्षीप्रेमींमध्ये हळहळ : विणीच्या काळातच शिकाऱ्यांनी केला घातवैभव बाबरेकर अमरावतीउन्हाळ्यातील विणीच्या काळात संसार थाटण्याच्या तयारीत असणाऱ्या राज्य पक्षी हरियलची शिकार झाल्याने पक्षी प्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. सुंदर व आकर्षक दिसणाऱ्या हा पक्षी अनुसूची ४ मधील असून अशीच शिकार होत राहिल्यास हा पक्षी दुर्मिळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्राचा राज्यपक्षी असलेला हरीयलला इंग्रजीत 'यलो फुटेज ग्रीन पिजन' असे नाव असून त्याला मराठीत हरोळी किंवा हरियल म्हणतात. हरीयलला 'ट्रेरॉन फोईनोकोप्तेरा' असे शास्त्रीय नाव आहे. त्याचा आकार २९ ते ३३ सेमी.पर्यंत असू शकतो. तसेच त्याचे वजन २२५ ते २६० ग्रॅमपर्यंत असून त्याचे पंख १७ ते १९ सेमीपर्यंत लांब पसरतात. त्याचे मुख्य खाद्य वड, पिंपळ व इतर मोठ्या झांडाची फळे आहेत. हरीयल पक्षी देशभरातील विविध ठिकाणी आढळून येत असून त्याचबरोबर श्रीलंका, बर्मा, पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश, चीन, थायलंड, कम्बोडीया इंडोनेशिया अशा ठिकाणीसुद्धा आढळून आले आहेत. शहरातील रस्त्येच्या कडेला असणारे तसेच बगिच्यातील झाडे हे त्यांचे आश्रयस्थान आहे. हे पक्षी जोडीने किंवा समुहांमध्ये राहतात, त्यामुळे त्यांची सामाजिक पक्षी म्हणून सुद्धा ओळख आहे. त्यांचा आवाज मधुर असून कर्णामधून ते एकाच वेळी दहा आवाज काढतात आणि तोही आवाज संगितमय असल्याचा अनुभव येतो. या पक्षांचा मार्च ते जुन या महिन्यादरम्यान मिलनाचा काळ असून त्यालाच विणीचा काळ म्हणतात. या विणीच्या काळात हरियल पक्षी संसार थाटण्यात मग्न असतात. या झाडावरून त्या झाड्यावर उडत ते घरटे तयार करण्यासाठी काडी-कचरा गोळा करतात. घरटे तयार करून नर-मादीचे मिलन होते आणि त्यानंतरच्या काही महिन्यातच मादी हरियल अंडी देऊन पिल्लांना जन्म देते. बडनेरा रेल्व स्थानकालगत पिंपळाच्या झाडावर हरीयल संसार थाटण्याच्या तयारीत होते. त्यांच्यावर शिकारी पाळत ठेऊन होते. पाच हरियल विषप्रयोगाने मृत्यूमुखी पडलेत. त्यांचा संसार व पुढील पिढी तेथेच थांबली. यामध्ये काही नर-मादीचा सहभाग होता.गुलेरने शिकार करणारे सक्रिय अनेक ठिकाणी झाडांवर हरियल पक्षी पहायला मिळतात. हरियल पक्षी अधंश्रध्देचे बळी पडत आहे. जिल्ह्याभरात अनेक ठिकाणी या पक्षांची शिकार होत असल्याची पुष्टी वन्यप्रेंमीने केली. शिकारी विहिणीच्या काळ्यात या पक्षांसाठी घात लावून असतात. विशेष समुदायातील नागरिक अंधश्रध्देतून हरियलची शिकार करतात. काही अज्ञांनी नागरिक खाद्यपदार्थ म्हणून उपयोग करतात. मात्र, हरीयलसह अन्य पक्ष्यांची शिकार करणे किंवा त्यांना इजा पोहचविणे हे गुन्हा असून त्यामध्ये कायद्याने शिक्षासुद्धा होऊ शकते. कायदा काय म्हणतो ?भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ च्या अनुसूची ४ मध्ये असणारा हरीयल पक्ष्याला राज्य पक्षी म्हणून मान्यता आहे. जम्मू-कश्मिर वगळता देशभरात हा कायद्या लागू आहे. संरक्षण श्रेणीनुसार वनकायद्यात एक ते सहा श्रेणी निर्माण करण्यात आली आहे. त्यामध्ये शेड्युल ४ मध्ये हरीयल पक्षी आहे. या पक्षाला त्रास देणे किंवा इजा करणे, यासाठी दंडासह शिक्षेची तरतूद आहे. राज्यपक्ष्याचा दर्जा महाराष्ट्रात पूर्वीच्या काळ्यात हरीयल पक्ष्यांची संख्या अधिक होती. त्यावेळी सर्रास शिकार केली जात होती. देशभरात आढळणारा सुंदर, देखणा व आकर्षक हा पक्षी दुर्मिळ होऊ नये, त्यालाही सरंक्षण मिळावे, यादृष्टीने हरीयलला राज्यपक्ष्याचा दर्जा दिल्याची माहिती पक्षीप्रेमी यादव तरटे यांनी दिली. वन्यप्राणी व पक्ष्यांची शिकार करणे, खरेदी व विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. नागरिकांनी प्राणी व पक्ष्यांचे पर्यावरणात असलेले महत्त्व समजून घेत जैवविविधता संवर्धनात वनविभागाला सहकार्य करावे. - यादव तरटे,वन्यजीव अभ्यासक