शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

सुवर्ण व्यवसायावर गदा, बंगाली कारागिरांचे अतिक्रमण

By admin | Updated: May 10, 2015 00:36 IST

एकीकडे श्रीमंत असल्याचा गैरसमज दुसरीकडे बंगाली कारागिरांचे व्यवसायावर अतिक्रमण तर तिसरीकडे बेरोजगारांची वाढती ...

त्रिकोणी संघर्षात अडकला समाज : सोनार समाजाची ससेहोलपटमोहन राऊत अमरावतीएकीकडे श्रीमंत असल्याचा गैरसमज दुसरीकडे बंगाली कारागिरांचे व्यवसायावर अतिक्रमण तर तिसरीकडे बेरोजगारांची वाढती संख्या अशा त्रिकोणी संघर्षात राज्यातील सोनार समाज बांधव अडकला आहे. ऐरणीवर सोने ठोकताना भक्तीचे ध्यान करीत संत नरहरी महाराजांना विठ्ठल मिळाला. आता या समाजाची ससेहोलपट थांबणार कधी, असा प्रश्न नेक्स्ट जनरेशन विचारत आहे़बारा बलुतेदारांपैकी एक बलुतेदार म्हणून समाजव्यवस्थेने निर्माण केलेल्या फळीमधला एक उपेक्षित राहिलेला समाज म्हणजे सोनार आजही या बारा बलुतेदारांपैकी एक असलेल्या जातीचे विकासाच्या प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी शासन उदासीन असल्याने तो समाज उपेक्षीतच राहीला आहे़ एवढेच नाही तर आपला कौटुंबिक गाडा चालविण्यासाठी गावोागावी जाऊन आपला उदरनिर्वाह भागवावा लागत आहे़सोनार समाज अहीर किंवा खानदेशी, अझर देवांग अथवा दैवज्ञ अथवा पंचाग सोनार, देशी किंवा मराठे सोनार, विदूर, कन्नड, कोकणी, लाड, माळवी, परदेशी, साड, शिलवंत, वैद्य, अथवा जैन या उपजाती राज्यात येतात़ या समाजाने अनेक पिढ्यांपासून आपली कला जोपासली आहे़ पूर्वीच्या आपल्या घराच्या पुढच्या भागात दुकान राहत असत. या दुकानात अनेक आविष्कारी दागिने तयार केली जात असत. आता ज्वेलरीने मोठी जागा घेतली आहे़ मोठ्या कॉपोरेट कंपन्यांनी ग्राहकांना नवीन आकाराचे दागिने बाजारात उपलब्ध करून दिल्याने गावकुसातील या समाजावर उपासमारीचे पाळी आली आहे़ या समाजातील शिक्षणाचे प्रमाण अधिक असले तरी रोजगार मिळत नाही. स्वरोजगारासाठी शासन पाऊल उचलत नसल्यामुळे बेरोजगारांची संख्या वाढली आहे़ सोन्या-चांदीसारख्या मौल्यवान धातूंचे सोनार हे काम करत असल्यामुळे यांना श्रीमंत समजले जाते़ परंतु हा केवळ गैरसमज आहे़सध्या सोनारांची उपासमार सुरू आहे़ क धी या सोनाराला रोजचे शंभर दोनशे रूपये मिळत असे. त्यात ते आपला उदरनिर्वाह भागवीत असत. परंतु आज त्यांना शंभर रूपयेसुध्दा मिळत नाहीत, ही शोकांतिका आहे.त्याला आपल्या कामासाठी गावोगावी फिरूनही कामे मिळत नाही़ सध्याची परिस्थिती पाहिली तर त्या सोनाराजवळ पोट भरण्यासाठीसुध्दा पैसे नाही. अशा महागाईच्या परिस्थितीमध्ये एका सोनाराला आपला उदरनिर्वाह चालवणे कुटुंबांना सुविधा देणे संभव होत नाही़ शहरात दिवसातून आठ-दहा घंटे एका जागेवर बसून काम केल्यामुळे सोनाराला आपल्या वयाच्या चाळीशीतच गुडघे दुखणे, पाठीच्या कन्याचे दुखणे या आजारांचा सामना करावा लागतो़ सोनार पन्नास वर्षाच्या पुढे काम करू शकत नाहीत़ त्यामुळे त्यांच्या पुढील आयुष्याचा प्रश्न गंभीर बनत आहे़ आज या व्यवसायावर बंगाली कारागिरांमुळे स्थानिक कारागीर अधिक हतबल झाला आहे़ सुवर्ण व्यवसायावर गदा आणणारे कलम लावण्यात येत आहे़ बेरोजगार कारागिरांना रोजगार मिळावा, उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शासनाने अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे़