५० टक्के वृक्षतोड थांबली : आपटा, अंजनवृक्षाच्या पानांचा वापरअमरावती : पुराणानुसार दसऱ्याला शमीच्या पानांचे आदानप्रदान करण्याचा नियम आहे. मात्र, दरवर्षी आपटा व अंजनवृक्षांच्या पानांचे आदान-प्रदान केले जाते. यासाठी होणारी वृक्षतोड थांबविण्यासाठी यंदा वनविभागाने जंगलावर निगराणी ठेवल्याने ५० टक्के वृक्षतोड घटली. मात्र, तरीही छुप्या मार्गाने आपटा व अंजनवृक्षांच्या पानांनी भरून आणले जाणारे दोन ट्रक व एक ट्रॅक्टर वनविभागाने बुधवारी जप्त केले आहे. दरवर्षी दसऱ्याला आपटा व अंजनवृक्षांच्या पानांचे आदान-प्रदान केले जाते. वन्यप्रेमी यावर नेहमीच आक्षेप घेत असतात. जंगलातून शमीचे वृक्ष दुर्मिळ झाले आहेत. त्यामुळे आता लोक कचनार, आपटा व अंजनसारख्या वृक्षांची पाने तोडून सर्रास त्याचेच आदान-प्रदान करतात. अलिकडे वनविभागाने या वृक्षतोडीवर अंकुश लावण्याकरिता आक्रमक पाऊले उचलली आहेत. यावर्षी जंगलांवर कडक निगराणी ठेवल्याने दसऱ्यासाठी होणारी वृक्षतोड ५० टक्क्यांनी घटल्याचे दिसून आले. धार्मिक शास्त्रानुसार दसऱ्याला शमीच्या पानाचे महत्व आहे. मात्र, आता नागरिक आपटा, अंजन व कचनार वृक्षांच्या पानांचे आदान-प्रदान करून दसरा साजरा केला जातो. त्यामुळे जगंलात वृक्षतोड वाढली आहे. वनविभाग व वायएनसीयूने पुढाकार घेऊन जगंलातील वृक्षतोड थांबविण्याचे प्रयत्न सुरु केल्यामुळे यंदा ५० टक्के वृक्षतोड कमी झाल्याचे आढळून आले. -स्वप्निल सोनोने. वन्यजीव अभ्यासक.
तीन ट्रक भरून दसऱ्याचे सोने जप्त
By admin | Updated: October 24, 2015 00:05 IST