शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

‘ब्रुसीलोसीस’चा आजार फोफावतोय

By admin | Updated: August 3, 2014 23:03 IST

मादी जनावरांमध्ये काही जिवाणू संक्रमण करतात. यामुळे गर्भपात होऊन जिवाणुंचा फैलाव होतो. हे जिवाणू मनुष्यासाठी अत्यंत घातक आहेत. यामुळे ‘ब्रुसीलोसीस’ हा आजार होतो. या आजारामुळे ‘नपुंसकत्व’ येण्याची

आजारी जनावरांचा संपर्क नपुंसकत्वाला कारणीभूत : २० टक्के व्यक्ती बाधितगजानन मोहोड - अमरावतीमादी जनावरांमध्ये काही जिवाणू संक्रमण करतात. यामुळे गर्भपात होऊन जिवाणुंचा फैलाव होतो. हे जिवाणू मनुष्यासाठी अत्यंत घातक आहेत. यामुळे ‘ब्रुसीलोसीस’ हा आजार होतो. या आजारामुळे ‘नपुंसकत्व’ येण्याची शक्यता असते. पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात २० टक्के व्यक्ती या आजाराने बाधित आहेत. यामध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या अधिक असल्याची माहिती पशूसंवर्धन विभागाचे उपायुक्त प्रकाश उंबरकर यांनी दिली. या जिवाणूमुळे गाईंचा ७, ८ किंवा ९ व्या महिन्यांत गर्भपात होतो. यावेळी हे जिवाणू बाहेर पडतात. याचा संपर्क मनुष्याशी आल्यास ‘ब्रुसीलोसीस’ हा आजार होतो.या आजारामुळे गर्भपात, टोंगळ्यावर सूज येणे, अंडकोषावर सूज तसेच सेक्स ग्रंथीवर संक्रमण होऊन नपुंसक होण्याची शक्यता असते. हा आजार प्रामुख्याने गाय, म्हैस, रानगवा, डुक्कर, बकरी, कुत्रा व घोड्यांना संक्रमित करतो. ‘ब्रूसेला एर्बोट्स’ या जिवाणूपासून हा आजार होण्याची शक्यता असते. असे होते जिवाणुंचे संक्रमण‘ब्रुसीलोसीस’ हा आजार माणसांना दूषित दुधपदार्थ तसेच आजारी जनावरे, जनावरांचे शव तसेच जनावरांच्या गर्भपाताद्वारे बाहेर येणाऱ्या जिवाणुंमुळे होतो. भारतात जनावरांपासून माणसांना होणाऱ्या आजारांंचे प्रमाण २५.८९ टक्के आहेत. यामध्ये वेदना, प्रॉस्टेट ग्रंथी वाढणे व मानसिक थकवा येतो. हा जिवाणुजन्य आजार‘ब्रूसीलोसीस’ हा जीवाणुजन्य आजार ‘ब्रूसेल्ला अबोर्टस’ नावाच्या जीवाणुमुळे होतो. हा रोग प्राण्यापासून माणसाला होतो. या रोगाला बॅग डिसीज, माल्टा फिवर, अंडुलंट फिवर आदी नावानेही ओळखले जाते. या रोगाची लागण झालेल्या प्राण्याचे निर्जंतूक न केलेले दूध किंवा मांस खाल्याने किंवा त्यांच्या शरीरातून निघालेल्या स्त्रावासी संपर्क आल्याने माणवास हा आजार होतो. या रोगाची लागण झालेल्या प्राण्याला कळपातून वेगळे ठेवावे लागते. त्या प्राण्यापासून उत्पादन घेता येत नाही. असा होतो संसर्ग निरोगी प्राण्याच्या शरीरात जंतू शिरल्यानंतर ते लिंक ग्रंथीमध्ये स्थिरावतात. तेथून शरीराच्या इतर भागात पसरतात. गाभण नसलेल्या प्राण्यांच्या शरीरात शिरलेले जंतू प्रथम कासेत स्थिरावतात. तेथून हे जंतू गर्भाशयात जातात आणि तेथेच वाढतात. गाभण गाई, म्हशींचे गर्भाशय, कास, नरांमधील अंडाशय सांध्यावरील पोकळी या भागात जंतू घर करतात. जंतुंमुळे कासेच्या आरोग्यामध्ये काही फरक पडत नाही. परंतु गर्भाशयाला जंतुंचा प्रादुर्भाव होत राहतो. गर्भारपणात गर्भाशयावर सूज, दाह आल्याने गर्भ मृत्यू पावतो. बरेचदा जंतू दुधातूनही बाहेर टाकले जातात.