शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

बेलोरा विमानतळाच्या डिझाईन, प्लानिंग निविदेची फाईल प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 22:40 IST

बेलोरा विमानतळाचे संरचना (डिझाइन), नियोजन (प्लॅनिंग) संदर्भात ई-निविदा निघाल्यानंतरही एजन्सी नेमण्यात आली नाही. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागात ही फाइल प्रलंबित असून, लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा तोकडा पडत असल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देएजन्सी नियुक्तीची प्रतीक्षा : शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाची दिरंगाई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बेलोरा विमानतळाचे संरचना (डिझाइन), नियोजन (प्लॅनिंग) संदर्भात ई-निविदा निघाल्यानंतरही एजन्सी नेमण्यात आली नाही. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागात ही फाइल प्रलंबित असून, लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा तोकडा पडत असल्याचे वास्तव आहे.महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने विमानतळाची डिझाइन, प्लॅनिंगसंदर्भात महिनाभरापूर्वी ई- निविदा काढली आहे. महिनाभरात अधिकृत एजन्सी नेमून विमानतळाची विकासकामे प्रारंभ होतील, असे संकेत होते. मात्र, अधिकाऱ्यांच्या उदासीनतेने विमानतळाची प्रस्तावित विकासकामे रखडल्याचे चित्र आहे. शासनाने ७५ कोटी मंजूर केले; त्यापैकी १५ कोटींचा पहिला टप्पा वितरित केला आहे. विमानतळाचे जानेवारी २०१८ मध्ये ओएलएस सर्वेक्षण झाले. त्यानंतर वस्तुनिष्ठ अहवाल केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला. ओएलएस सर्वेक्षणानंतर विमानतळाचे डिझाइन, प्लॅनिंगसाठी यापूर्वी ई-निविदा प्रक्रिया राबविली. मात्र, दोनच एजन्सींनी निविदेत सहभाग घेतला होता. त्यामुळे पुन्हा नव्याने ई-निविदा निघाल्या. या ई-निविदेत राष्ट्रीय स्तरावरील एजन्सीने सहभागी व्हावे, यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. मात्र, ई-निविदेनंतर पुढे काय, हा प्रश्न आजही कायम आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने शिर्डीच्या धर्तीवर बेलोरा विमानतळाच्या विकासाची वाटचाल चालविली. परंतु, ई-निविदेनंतर एजन्सी नेमण्याची प्रक्रिया रखडल्याची माहिती आहे.बेलोरा विमानतळाची प्रस्तावित विकासकामेबेलोरा विमानतळाचे डिझाइन, नियोजन ई-निविदा प्रक्रियेअंती एजन्सी नेमली जाणार आहे. यात विमानतळ धावपट्टीची लांबी १८५० मीटर केली जाईल. टर्मिनल इमारत, अग्निशमन केंद्र, एटीसी टॉवर निर्मिती, अप्रन क्षमतेत वाढ, तीन एटीआर व एक एअर बस बोर्इंग, विद्युत वाहिन्यांची पुनर्बांधणी, रस्ते चौपदरीकरण, पाणीपुरवठा व्यवस्था, वाहनतळ, सुरक्षा यंत्रणा, इमारत बांधकामाचे स्वरूप आदी विकासकामे प्रस्तावित आहेत.पालकमंत्र्यांकडे विशेष जबाबदारीपालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सन २०१८ अखेर बेलोरा विमानतळाचे विविध विकासकामे पूर्णत्वास आणून येथून विमानसेवा सुरू करण्याचे यापूर्वीच जाहीर केले. त्यामुळे विमानतळाच्या विकासात येणारे अडथळे, निधीचा वानवा आदी बाबी दूर करण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांचीच आहे. बेलोरा विमानतळाच्या डिझाइन, प्लॅनिंगची निविदा निघाली असताना, पुढील प्रक्रियेने गती घ्यावी, यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घेणे आता गरजेचे झाले आहे.