वरुड : तालुक्यात ठिकठिकाणी घाणिचे साम्राज्य पसरल्याने साथरोगाचा मोठ्या प्रमाणात फैलाव वाढला आहे. येथील एका खासगी रुग्णालयात डेंग्यूचे १० रुग्ण आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गेल्या आठवडयाभरा पासुन पवनी येथील २० वर्षीय विद्यार्थिनीचा डेंग्यूच्या तापाने नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता .तालुक्यातील संक्राजी पवनी येथील एका २० वषीय विद्याथीनीचा डेंग्यूच्या तापाने नागपूर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. पुन्हा वरुड येथील खासगी रुग्णालयात डेंग्यूच्या आजाराने त्रस्त असलेले रुग्ण उपचार घेत असल्याने इतरही रुग्णालयात डेंग्यूचे रुग्ण दाखल असावे, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मागील वर्षापासून तालुक्यात पावसाळ्याच्या दिवसात घाणीचे साम्राज्य पसरल्याने साथीचा फैलाव होत असल्याने अनेकांचे बळी जात आहे. ताालुक्यामध्ये गेल्या ४-५ वर्षामध्ये अनेकांनी आपले प्राण गमवावे लागले. तरीही संबंधीत अधिकाऱ्यांना जाग आली नाही. शहरामध्ये अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. जागोजागी शेण खताचे ढिगारे पसरले असून यामुळे रोगराई वाढल्याचे बोलले जात आहे. डेंग्यू तापाने भारती वसंत उईके (२० रा.पवनी, संक्राजी) हिला आपले प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. वैद्यकिय अधिकाऱ्यांची कमतरता ? तालुक्यात पाच प्राथमिक स्वास्थ केंद्र असून वैद्यकिय अधिकाऱ्यांची कमतरता आहे. वरुडच्या ग्रामीण रुग्णालयात सुध्दा दोनच डॉक्टर तालुक्यात येणाऱ्या रुग्णांची तपासणी करीत आहे. याकडे मात्र आरोग्य विभागाचे दुर्लक्ष आहे. साथीचे आजार आल्यास रुग्णसेवा कशी करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
वरुडमध्ये डेंग्यूचे रुग्ण
By admin | Updated: August 12, 2014 23:31 IST