चार तास युक्तिवाद : अमित बटाऊवाले हत्याप्रकरणपरतवाडा : बहुचर्चित अमित बटाऊवाले हत्या प्रकरणात तीन आरोपींच्या जामिनावर बुधवारी वकिलांनी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.बी. हेडावू यांच्या न्यायालयात चार तास युक्तिवाद केला. याप्रकरणी १२ फेब्रुवारी रोजी निर्णय होणार आहे. अचलपूर येथे वाळू तस्करांनी अमित बटाऊवाले याची १० आॅगस्ट २०१५ रोजी हत्या करुन त्याचे वडिल मोहन बटाऊ वाले यांना मारहाण केली होती. ते सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. यातील आरोपी अर्शद खान, मो. आदिल मो. अनवर व लकी अली सादीक अली यांच्या जामीनसाठी त्यांच्या वकिलांनी अर्ज केला होता. बुधवारी दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी अभियोक्ता उमेशचंद्र यादव पाटील यांनी भक्कम युक्तिवाद केला. वस्तुजन्य पुरावे, वापरण्यात आलेले हत्यारे, प्रत्यक्षदर्शी पुरावे ओळख परेड, वैद्यकीय अहवाल व अशा आरोपीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या दिशानिर्देशाचे दस्तावेज न्यायालयात सादर केले. आरोपींच्या वकिलांनीसुध्दा जामीन मिळावा, यासाठी आपली बाजू मांडली. दोन्ही बाजूकडील युक्तिवाद न्यायाधीशांनी ऐकून घेतला.
१२ फेब्रुवारीला तीन आरोपींच्या जामिनावर निर्णय
By admin | Updated: February 11, 2016 00:29 IST