६० हजारांचे नुकसान : वीज कंपनीचा भोंगळ कारभारचांदूररेल्वे : तालुक्यातील मौजा कवठा (कडू) येथील शेतकरी हरिश्चंद्र फकीरजी लोमटे यांचा बैल बंडी नेहमीच्या रस्त्याने शेतात जात असताना विद्युत डी.बी.मधून शॉक लागल्याने बैल दगावला. बंडीवरील अतुल रुपराव कडू (२८ ) हा बैलाचा कान व दोर धरायला गेला असता त्याला शॉक लागला. परंतु पायात रबरी चप्पल असल्यामुळे तो बचावला. मृत बैल उमदा व धडधाकट ६० हजार रुपये किंमतीचा होता. झाकन नसलेल्या डीबी या ग्रामीण भागातील नागरिकांना जीवघेण्या ठरल्या आहेत. डीबीतील निघालेले ताराचे आवरण फाटलेले आहे. कदाचित अनेक माणसे दगावली असती. महावितरणची अक्षम्य बेजबाबदारी त्यास कारणीभूत आहे. रिपोर्ट मिळूनसुद्धा पोलिसांनी याबाबत कार्यवाही केली नाही. शॉक लागण्याचे कारण समजून घेणे आवश्यक आहे, अशी मागणी किसान सभेचे शिवाजी देशमुख यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
बैलाचा विद्युत शॉक लागून मृत्यू
By admin | Updated: July 11, 2016 00:11 IST