शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अंधाऱ्या रात्रीवर चोरट्यांचीच सत्ता !

By admin | Updated: December 4, 2015 00:28 IST

शहरात काही महिन्यांपासून चोरी, घरफोडी व इतर घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या अनुषंगाने अंधाऱ्या रात्रीवर चोरटेच सत्ता गाजवत असल्याचे उघड झाले आहे.

पाच दुकाने फोडली : रात्रकालीन गस्तीवर प्रश्नचिन्हअमरावती : शहरात काही महिन्यांपासून चोरी, घरफोडी व इतर घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या अनुषंगाने अंधाऱ्या रात्रीवर चोरटेच सत्ता गाजवत असल्याचे उघड झाले आहे. बुधवारी रात्री शहर कोतवाली हद्दीतील ५ दुकाने फोडल्याच्या घटनेने तर रात्रकालीन गस्तीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. वालकट कम्पाऊंडमधील पाच दुकाने फोडल्याची घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली. या दुकानांमधून चोरट्यांनी सुमारे ९५ हजारांचा ऐवज लांबविला. एकाच रांगेत असलेली पाच दुकाने एकाच रात्रीतून फोडण्यात आली. वालकट कम्पाऊंड परिसरात केडिया ट्रेडर्स, महेश ट्रेडिंग, दातेराव इलेक्ट्रॉनिक्स यासह भारत आॅटो व विमल आॅटो ही दुकाने एका लाईनमध्ये आहेत. पाचही प्रतिष्ठानांचे संचालक बुधवारी रात्री १०.३० च्या सुमारास प्रतिष्ठान बंद करून घरी गेले. गुरुवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास ही सारी मंडळी आपआपली प्रतिष्ठाने उघडण्यासाठी आली. तथापि या सर्व प्रतिष्ठानांची बाहेरची कुलुपे सुस्थितीत होती. प्रतिष्ठान उघडल्यानंतर आतील साहित्य अस्तव्यस्त दिसून आले. मात्र दुसऱ्या माळ्यावरील छतावर जाऊन पाहिले असता तेथील कुलुपे तुटलेल्या अवस्थेत आढळली. महेश ट्रेडिंगचे संचालक गौरीशंकर हेडा यांनी प्रथम शहर कोतवालीत तक्रार नोंदविली. हेडा यांच्या महेश ट्रेडिंगमधून चोरट्याने ८० हजार रुपये चोरून नेले. नजीकच्या दातेराव इलेक्ट्रॉनिक्समध्येही चोरटे शिरले. मात्र त्यांच्या काऊंटरमध्ये रक्कम नसल्याने नुकसान टळले. चोरट्याने अन्य कुठल्याही साहित्याला हात लावला नाही, असे अजय दातेराव यांनी सांगितले. याशिवाय केडिया ट्रेडर्समध्येही चोरीचा प्रयत्न करण्यात आला. सावन राठी यांच्या विमल आॅटो या प्रतिष्ठानाचे कुलूप तोडून चोरटे आत शिरले. तेथे चोरट्यांचे हाती रक्कम लागली नाही. तर सिंधूनगर येथील सुनील अगनानी संचालित भारत आॅटोमधून चोरट्यांनी गल्ल्यातील १५ हजार रुपये चोरून नेले. एकाच रात्रीतून एकाच रांगेत असलेली पाच दुकाने फोडल्याच्या घटनेने व्यापारी वर्तुळात खळबळ माजली आहे. तर पोलिसांच्या रात्रकालीन गस्तीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. घटनेची माहिती मिळताच शहर कोतवालीसह गुन्हेशाखेचे पथकही घटनास्थळी पोहोचले. महेश ट्रेडिंग व्यतिरिक्त अन्य कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे आढळून आले नाही. श्वान पथकासह ठसेतज्ज्ञांनाही घटनास्थळावर पाचारण करण्यात आले. चोरटे कुठलेतरी वाहन घेऊन आले असावे आणि चोरट्यांची संख्या २ किंवा त्यापेक्षा अधिक असावी, अशी शक्यता गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रमेश आत्राम यांनी व्यक्त केली.