शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

खाद्यपदार्थांमध्ये घातक ‘अजिनोमोटो’चा बेसुमार वापर!

By admin | Updated: May 12, 2016 00:13 IST

जीभेचे चोचले पुरविण्यासाठी मागील काही वर्षांपासून खवय्यांसाठी ‘चायनिज’ पदार्थांचा पर्याय समोर आला आहे.

जिभेचे चोचले ठरू शकतात घातक : ब्रेन हॅमरेजसह पोटाच्या विकारांचीही शक्यतासंदीप मानकर  अमरावतीजीभेचे चोचले पुरविण्यासाठी मागील काही वर्षांपासून खवय्यांसाठी ‘चायनिज’ पदार्थांचा पर्याय समोर आला आहे. नेहमीच्या पदार्थांपेक्षा वेगळ्या, चटपटीत चवींमुळे हे चायनिज पदार्थ आबालवृध्दांमध्ये अल्पावधीत लोकप्रिय झाले आहेत. नुडल्सचे विविध प्रकार, मंच्युरियन, फ्राईड राईससह शेकडो पदार्थ आता चक्क हातगाड्यांवरही मिळतात. परंतु जिभेची चव भागविताना आपण किती हानीकारक पदार्थ नकळत पोटात ढकलत आहोत, याची जाणीव खाणाऱ्यांना नसते. मानवी शरीरासाठी अत्यंत घातक असलेल्या ‘अजिनोमोटो’ पावडरचा बेसुमार वापर चायनिजसह अन्य खाद्यपदार्थांमध्ये देखील वाढला आहे. अजिनोमोटे हे एक प्रकारचे प्रिझर्व्हेटिव्ह तर आहेच पण, यामुळे खाद्यपदार्थांना आगळी चव येते. परंतु वारंवार अजिनोमोटोयुक्त पदार्थांचे सेवन केल्यास पोटाचे व मेंदूचे आजार जडत असल्याचे तज्ज्ञ डॉकटरांचे मत आहे. परंतु याकडे अन्न व औषधी प्रशासन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. शहरातील पंचवटी चौक, गाडगेनगर, राजकमल चौकासह शहरातील विविध गल्लीबोळातही चायनिज पदार्थांच्या हातगाड्या दिसून येतात. या हातगाड्यांवर घातक खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. हे अन्न पदार्थ बराच काळ ताजे रहावेत आणि ग्राहकांना आकर्षित करणारी चव त्या पदार्थाला लाभावी, यासाठी अजिनोमोटो पावडरचा वापर खाद्यपदार्थ विक्रेते करतात. या पावडरच्या अति वापरामुळे आतड्यांचे आजार संभवतात. हा पदार्थ नियमित पोटात गेल्यास ‘ब्रेन हॅमरेज’ देखील होऊ शकते, अशी माहिती आ.तथा डॉक्टर सुनील देशमुख यांनी सांगितले. मटण आणि चिकन फ्राय करुन विकणाऱ्या हातगाडयांवर देखील अजिनोमोटो पावडरचा वापर सर्रास करण्यात येत आहे. शरीराला हानीकारक असलेल्या या पावडरचे नमुने घेऊन अन्न व प्रशासन विभागाने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविल्यास यापासून संभवणारे घातक परिणाम समोर येऊ शकतील. मात्र, अन्न व प्रशासन विभागाने कधीही अशा पदार्थांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले नाहीत, ही शोकांतिका आहे. चायनिज खाद्यपदार्थ विक्रेते भेसळयुक्त पदार्थ विकत असतील तर ते तपासले पाहिजे. अनेक हॉटेल्समध्ये अजिनोमोटोचा वापरअन्न पदार्थ चटपटीत व चवदार व्हावेत यासाठी मटण, चिकन, अंडाकरी आणि इतर अनेक भाज्यांमध्ये अजिनोमोटो पावडरचा वापर केला जातो. यामुळे शिळे पदार्थ देखील ग्राहकांना ताजेच वाटावेत, असे राहतात. असे नाव न सांगण्याच्या अटीवर एका हॉटेलशी संबंधित व्यक्तिने सांगितले. सतत अजिनोमोटो पावडरचा वापर अन्न पदार्थात होत असेल तर ते शरीराला घातक आहे. ‘एफडीए’कडे अनेक चायनीज खाद्यपदार्थ विक्रेत्यांची नोंदच नाही कुठल्याही खाद्यपदार्थांची विक्री करताना अन्नसुरक्षा मानदे कायद्यानुसार अन्न व औषधी प्रशासनाकडून नोंदणी व महापालिकेकडून परवाना घेणे अनिवार्य आहे. परंतु शहरातील अनेक चायनीज हातगाड्या चालक सर्व नियम धाब्यावर बसवून अन्नपदार्थ विक्री करतात. याकडे एफडीएच्या अधिकाऱ्यांचे कायम दुर्लक्ष असून बोटावर मोजण्या इतक्याच कारवाया होत आहेत. शहरात अन्नातून आजार विकले जात असताना एफडीए अधिकारी गप्प का, हा प्रश्नच आहे. कॅन्सर, आतड्यांचेही होतात आजारएका कंपनीच्या नुडल्समध्ये अजिनोमोटोचा वापर प्रमाणापेक्षा अधिक केल्याने शासनाने त्यावर बंदी घातली होती. परंतु चायनीज खाद्यपदार्थांच्या हातगाडयांवर अजिनोमोटोचा वापर सर्रास केला जात आहे. हे अन्न पदार्थ सतत सेवन केल्याने कॅन्सर होतो. तसेच आतड्यांचे आजार व पोटाचे ईन्फालामेंट्री बाऊल डीसीस होऊ शकतो. हे पदार्थ खाण्यात आल्याने शौचावाटे रक्त पडणे, आव येणे अशाप्रकारचा त्रासही संभवतो, असे शल्यचिकित्सक प्रवीण बिजवे यांनी सांगितले. अजिनोमोटो एक प्रकारचे विषच असून ते फास्ट फूडमध्ये वापरले जाते. यामुळे मुलांना भूक लागते. लठ्ठपणा वाढतो. डायबिटीज, किडनीचे आजार व स्मृतिभ्रंशासारखे आजार बळावतात. - अतुल यादगिरे, कॅन्सरतज्ज्ञ.