शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

शहानूरची सुरक्षितता धोक्यात

By admin | Updated: July 27, 2016 00:14 IST

दोन मोठ्या शहरासह १५६+७९ गावांना पाणीपुरवठा करीत असलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठा गणल्या गेलेल्या....

विद्युत खांबावरील वीजपुरवठा बंद : धरणाच्या बाजूला अवैध उत्खननचेतन घोगरे अंजनगाव सुर्जीदोन मोठ्या शहरासह १५६+७९ गावांना पाणीपुरवठा करीत असलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठा गणल्या गेलेल्या व लिमका बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद असलेला शहानूर प्रकल्प व पूर्णत: गुरुत्वाकर्षण शक्तीवर आधारित अशा शहानूर धरण प्रकल्पाची सुरक्षितता व धरणाच्या काही अंतरावरच अवैध मुरुम उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे तेथील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित व कामचुकारपणामुळे पावसाळ्याच्या तोंडावर धरणाची सुरक्षितता धोक्यात आली आहे.सुरुवातीलाच शहानूर धरणावर जात असलेल्या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे पावसाळ्यात येणाऱ्या निसर्गप्रेमींना कसरत करावी लागत आहे. त्यातच धरणाच्या मुख्य गेटजवळील असलेले एकूण २४ विद्युत खांबांवरील सर्व लाईट फुटलेले व लोमकळत दिसून येतात. काही विद्युत खांब मधोमध तुटलेले आहेत, तर काहींचे विद्युत प्रवाहाचे तार उघड्यावर लोमकळत आहेत. काही दिवसांपूर्वी शासनाने अंमलात आणलेल्या झाडे लावा झाडे जगवा या योजनेंतर्गत धरणाच्या मुख्य प्रवेशाच्या गेटजवळून दोन किमी लावण्यात आलेल्या वृक्ष लागवडीच्या खड्ड्यातील माती डांबरीकरणाच्या रोडवर आल्याने व त्या वृक्षांचे खड्डे न बुजविल्याने येणारे-जाणारे दुचाकी चालक अपघातास बळी पडत आहेत. तसेच धरणाच्या पाणी सोडणाऱ्या चार गेटजवळ कबुतरे व इतर पक्षी मृत्यूमुखी पडलेले दिसून येतात त्यामुळे तेथील पाणी दूषित तर नाही ना? किंवा कुणी त्यामध्ये द्रैवीक औषध तर टाकले नाही ना? असा प्रश्न निर्माण होतो. धरणाच्या पाणी साठ्यामध्ये सद्याच्या परिस्थितीत ६५ टक्के वाढ झालेली दिसून येते. तसेच तिथे असलेल्या विद्युत जनित्रगृह, संगणक कक्ष या इमारत नादुरुस्त असल्याचे दिसते व पावसाळी दिवस असल्यामुळे पाऊस येताच ही इमारतीच्या छप्परातून पाणी गळते. यासाठी तेथील कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक इमारतीवर प्लॅस्टीक कागद टाकून त्यावर गाडीतील खराब इंजिन आॅईल टाकले आहे. जेणेकरून पाणी छप्परातून गळणार नाही. धरण प्रकल्पाच्या बाजूला असलेल्या सातपुडा पर्वतरांगेतून खुलेआम अवैध मुरूम उत्खलन सुरू आहे. तरी हे उत्खलन कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे. याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देणार काय, हा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. अशा प्रकरणामुळे शहानूर धरण प्रकल्पाची सुरक्षितता धोक्यात आली आहे.धरणाजवळील कर्मचारी वसाहत नादुरुस्तशहानूर धरणाजवळ असलेली कर्मचारी वसाहतीमधील घरे नादुरुस्त असल्यामुळे तेथे कोणताच कर्मचारी राहू शकत नाही. पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा सुद्धा नसल्याने कर्मचारी येथे वास्तव्यास नाही. शाखा अभियंता या कर्मचाऱ्यास तेथे राहण्यास आग्रही करीत आहेत, अशी माहिती तेथील कर्मचारी नाव न सांगता ‘लोकमत’ला दिली आहे.१ मे पासून मी सदर कारभार सांभाळला आहे. धरणावरील विद्युत दुरुस्ती करण्याकरिता विद्युत कारागिराला सांगितले आहे व बाजूला चालू असलेल्या अवैध मुरुम उत्खनन हे धरण प्रकल्पाच्या हद्दीत येते किंवा नाही याची माहिती घेऊन उत्खनन करणाऱ्यांवर निश्चित कारवाई होईल.- रवींद्र शेगोकार, शाखा अभियंता, सिंचन प्रकल्प