शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

नगरसेविका नामधारी; पतिराजच कारभारी !

By admin | Updated: March 12, 2017 00:25 IST

मावळत्या सभागृहाच्या तुलनेत यंदा महिला नगरसेविकांची संख्या २ ने वाढली असताना येत्या पाच वर्षात तरी ‘नगरसेविका नामधारी, पतिराजच कारभारी’ हे चित्र पालटेल का, असा प्रश्न विचारला जात आहे.

चित्र पालटेल का ? : महापालिकेत ४७ महिला सदस्यअमरावती : मावळत्या सभागृहाच्या तुलनेत यंदा महिला नगरसेविकांची संख्या २ ने वाढली असताना येत्या पाच वर्षात तरी ‘नगरसेविका नामधारी, पतिराजच कारभारी’ हे चित्र पालटेल का, असा प्रश्न विचारला जात आहे. २०१२ ते २०१७ या कालावधीत महापालिकेतील बहुतांशी नगरसेविकांच्या प्रभागांमधील विकासकामांपासून जनसंपर्कापर्यंत सर्व जबाबदाऱ्या त्यांचे पतिराजच सांभाळत असल्याचे दिसून आले होते. २०१७ ते २०२२ या पंचवार्षिकमध्ये किमान हे चित्र पालटेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रभागातील कामे किंवा नव्या प्रभाग रचनेबाबत नगरसेविकांकडे विचारणा केली तरी त्यांच्याशी बोलता का, असा प्रश्नवजा सल्ला ‘त्या’ देत असल्याचे नगरसेविकांशी संपर्क साधल्यानंतर जाणवले होते. परिणामी बहुतेक नगरसेविका या नावापुरत्याच असल्याचेही स्पष्ट झाले होते. काहींचे काम प्रभावीमहापालिकेतील अनेक नगरसेविकांची कामे त्यांचे पती करीत असले तरी काही नगरसेविकांनी प्रभागात प्रभावी कामे केली आहेत. महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी नव्या योजना राबविण्यात महिलांचा पुढाकार दिसून आला. रखडलेल्या प्रश्नांबाबत त्या सातत्याने पाठपुरावा करून ते मार्गी लावण्याचा प्रयत्न केल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे आताच्या सभागृहातील ४७ महिला नेमका कुठला कित्ता गिरवतात, याकडे लक्ष लागले आहे.काहींनी गाजविले होते सभागृहअमरावती : महापालिकेतील काही नगरसेविकांना अक्षरश: सभागृह गाजविले. मात्र ती संख्या बोटावर मोजण्याइतपत होती, हा भाग अलहिदा.महापालिकेच्या ८७ सदस्यीय सभागृहात यंदा ४७ महिला नगरसेविका पोहोचल्या आहेत. पुरुषांच्या तुलनेत ही संख्या ७ ने अधिक आहे. यातील सर्वाधिक नगरसेविका भाजपच्या असल्या तरी शिवसेना, बसपा, एमआयएम आणि काँग्रेसकडूनही अनेक नगरसेविका पहिल्यांदा सभागृहात पोहोचल्यात. कुसुम साहू, उपमहापौर संध्या टिले, सुनंदा खरड या अनुभवी नगरसेविकासुद्धा सभागृहात आहेत. मात्र अनेक जणी आरक्षण बिघडल्याने ऐनवेळी उमेदवार झाल्या व जिंकूनही आल्या हे चित्र सुखद आहे. बहुतांश नगरसेविकांचे पती विविध संबंधित पक्षात कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांनी प्रभागातील समस्या सभागृहात मांडाव्यात, चर्चेत सहभाग घ्यावा, अशी मतदारांची इच्छा आहे. अन्यथा मागील पंचवार्षिकमध्ये काही नगरसेविकांचे पतीच हातात फाईल घेऊन अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवित आहेत.काहींचे काम प्रभावीमहापालिकेतील अनेक नगरसेविकांची कामे त्यांचे पती करीत असले तरी काही नगरसेविकांनी प्रभागात प्रभावी कामे केली आहेत. महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी नव्या योजना राबविण्यात महिलांचा पुढाकार दिसून आला. रखडलेल्या प्रश्नांबाबत त्या सातत्याने पाठपुरावा करून ते मार्गी लावण्याचा प्रयत्न केल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे आताच्या सभागृहातील ४७ महिला नेमका कुठला कित्ता गिरवतात, याकडे लक्ष लागले आहे.‘पतिराज’च देतात अधिकाऱ्यांना निर्देशसकाळच्या स्वच्छतेच्या पाहणीसह अन्य कामातही हे पतीराज घुसखोरी करतात. विकासकामांच्या फाईल्स नगरसेविकांच्या ऐवजी त्यांचे पतीराज हाताळतात. शहरातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही ‘त्या’ फारशा बोलत नसल्याचे वारंवार दिसून आले. प्रभागातील महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पतिराजांच्या सल्ल्यानुसारच सभागृहात ‘त्या’ भूमिका मांडत असल्याचे सांगण्यात येते.वादाचे प्रसंगनगरसेविकांऐवजी त्यांचे पतिराज किंवा कुटुंबातील अन्य एखादा सदस्य फाईल घेऊन अधिकाऱ्यांकडे जातात. स्वच्छता व अन्य कामांबाबत निर्देशही देतात. त्यामुळे मागील पंचवार्षिकमध्ये असे पतीराज व अधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याचे प्रसंग ताजे आहेत. अतिरिक्त शहर अभियंत्यासह अनेक अधिकाऱ्यांना अशा प्रसंगाला सामोरे जावे लागले.