शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
3
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
4
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
5
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
6
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
7
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
8
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
9
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
10
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
11
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
12
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
13
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
14
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
15
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
16
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...
17
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
18
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
19
“ज्योतीला फसवले जातेय, सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५-२०-२५ हजार कमावते”; वडिलांचा दावा
20
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट

कोरोनाने ज्येष्ठांचे घेतले सर्वाधिक बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:11 IST

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचे एप्रिल २०२० मध्ये आगमन झाले. मात्र, आजतागायत कोरोनाचा संसर्ग कायम असून, दुसरी लाट उंबरठ्यावर आहे. ...

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचे एप्रिल २०२० मध्ये आगमन झाले. मात्र, आजतागायत कोरोनाचा संसर्ग कायम असून, दुसरी लाट उंबरठ्यावर आहे. सद्य:स्थिती लक्षात घेता सरकारने कडक लॉकडाऊनचे संकेत दिले आहे. मात्र, एप्रिल २०२० ते मार्च २०२१ दरम्यान जिल्ह्यात कोरोनाने ६७४ रुग्णांचा बळी घेतला. यात ५१ ते ८० वयोगटातील सर्वाधिक ४९२ ज्येष्ठांचा समावेश आहे.

अमरावती विभागात अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ व अमरावती या पाचही जिल्ह्यात लगतच्या अन्य जिल्ह्याच्या तुलनेत कोरोनाची दुसरी लाट सौम्य असल्याचे चित्र आहे. परंतु, यंदा मार्च महिन्यात कोरोनाचे सर्वाधिक १३,५१८ संक्रमित आढळून आले, तर १६४ रुग्णांचे मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाने केली आहे. जिल्हावासीयांसाठी नवीन वर्षातील मार्च महिना कोरोना ‘हॉट’ ठरला आहे. गतवर्षी सप्टेंबरमध्ये १५४ तर, यावर्षी मार्च महिन्यात सर्वाधिक १६४ जणांचे कोरोनाने बळी घेतले आहे. मार्चपर्यंत कोराेनाने ६७४ रुग्ण दगावले. यात ४९६ पुरुष, तर १७८ महिलांचा समावेश आहे. ९१ ते १०० वयोगटातील सहा रुग्णांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. त्यामुळे कोरोनाच्या उपाययोजना म्हणून प्रशासनाने मास्कचा वापर, शारीरिक अंतर, नियमित हात धुणे, गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली आहे.

------------------

असा वाढला मृत्यूचा आलेख

एप्रिल २०२०- १०

मे- ५

जून- ९

जुलै-४०

ऑगस्ट- ७४

सप्टेंबर- १५४

ऑक्टोबर- ७२

नोव्हेंबर- १४

डिसेंबर - १८

जानेवारी २०२१- २२

फेब्रुवारी- ९२

मार्च - १६४

-----------------------

मयत ज्येष्ठांचे वयोगट

५१ ते ६० : १६४

६१ ते ७० : १९५

७१ ते ८० : १३३

८१ ते ९० : ५१

९१ ते १०० : ६

-------------------

एप्रिल २०२० ते मार्च २०२१ दरम्यान कोरोनाचा दृष्टिक्षेप

एकूण नमुने चाचणी : ३२१६५७

पॉझिटिव्ह रूग्ण : ४८६३५

एकूण मृत्यू : ६७४ (महापालिका ३८६, ग्रामीण २८८)

होमआयसोलेशन : १६३३२ (महापालिका १०२६०, ग्रामीण ६११२)

-------------------

कोरोनाने ५१ ते ८० वयोगटातील ज्येष्ठांचे सर्वाधिक बळी घेतल्याचे वास्तव आहे. मात्र, आता कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण माेहीम वेगाने सुरू आहे. ज्येष्ठ नागरिकांनी त्वरेने लस टोचून घ्यावी. लसीबाबत संभ्रम बाळगू नये.

- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्य चिकित्सक